Grammy 2022 : भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी..

भारतीय वंशांच्या अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांना 'सर्वोत्कृष्ट चील्ड्रन्स म्युजिक अल्बम' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यंदाच्या नामांकनात भारतीय वंशाच्या त्या एकमेव होत्या.
grammy winner falguni shah
grammy winner falguni shah google

Grammy 2022 : संगीत क्षेत्रातील सर्वोच्च ६४ व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये यंदा दोन भारतीयांनी विजयची गुढी उभारली आहे. अमेरीकन वंशाच्या, भारतीय असलेल्या रिकी केज (ricky kej) यांना 'सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम' हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर भारताच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला. भारतीय वंशांच्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या फाल्गुनी शाह (falguni shah) यांनीही आपले नाव ग्रॅमी वर कोरले आहे.

grammy winner falguni shah
Grammy 2022 : अभिमानास्पद, भारताच्या रिकी केज यांना ग्रॅमी, नमस्ते करून..

फाल्गुनी शाह यांना ग्रॅमीचा 'सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स अल्बम' पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या 'कलरफुल वर्ल्ड' या अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला आहे. फाल्गुनी शाहला फालू (falu) या टोपणनावाने ओळखले जाते. याच नावाने ती समाज माध्यमांवरही ओळखली जाते. ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. आपल्या इंस्टाग्राम अकाउनवरून तिने फोटो ;पोस्ट करून चाहत्यांना हि बातमी दिली.

grammy winner falguni shah
अपघातानंतर मलायकाने प्रियकरासोबत घरामध्ये..

फाल्गुनीने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, 'आजचा पुरस्कार ही केवळ एक जादू आहे ज्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. या सर्वोच्च पुरस्कार सोहळ्यात इतक्या मोठ्या दिग्गजांपुढे सादरीकरण करणे आणि हे पारितोषिक मिळवणे हे मी भाग्याचे समजते,'असे फाल्गुनी म्हणते. तसेच 'आम्ही नम्र आहोत आणि या सन्मानासाठी आम्हाला योग्य समजलं त्याबद्दल रेकॉर्डिंग अकादमीचे आम्ही मनापासून आभार मानतो, तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो,'असेही तिने लिहिले आहे.

grammy winner falguni shah
Grammy 2022: पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकरांच्या बाबतीत घडली घोडचूक...

फाल्गुनी शाहने संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासोबतही काम केले आहे. याआधी ग्रॅमीमध्ये तिला दोन वेळा 'सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स म्युजिक अल्बम' या श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. यंदाच्या नामांकनात भारतीय वंशाची ती एकमेव महिला कलाकार होती. फाल्गुनी शाहला ग्रॅमी २०१८ मध्ये 'फालूज बाजार' या अल्बमसाठी त्याच श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. फालूने जयपूर घराण्याची संगीत परंपरा आणि ठुमरीच्या बनारस शैलीचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने वायक्लेफ जीन, फिलिप ग्लास, रिकी मार्टिन, ब्लूज ट्रॅव्हलर आणि यो-यो मा यांसारख्या आंतरराष्ट्रीय संगीतकारांसोबतही काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com