Indian Idol 12: वादावर अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "गाणी ऐकून मी चकीत झाले" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anuradha Paudwal

Indian Idol 12: वादावर अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "गाणी ऐकून मी चकीत झाले"

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'चं Indian Idol 12 बारावं पर्व सध्या मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एपिसोडमध्ये किशोर कुमार Kishore Kumar यांची गाणी स्पर्धकांकडून सादर करण्यात आली होती. यावेळी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार Amit Kumar प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शो संपल्यानंतर अमित कुमार यांनी त्या एपिसोडवर टीका केली. स्पर्धकांनी किशोर कुमार यांच्या गाण्यांना न्याय दिला नाही, असं त्यांनी म्हटलं. या सर्व वादावर आता गायिका अनुराधा पौडवाल Anuradha Paudwal यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Indian Idol 12 Anuradha Paudwal defend contestants after Amit Kumars criticism)

काय म्हणाल्या अनुराधा पौडवाल?

'इंडियन आयडॉल'च्या एका एपिसोडसाठी अनुराधा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. स्पर्धकांची गाणी ऐकल्यानंतर त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. "या रिअॅलिटी शोमधील सर्व स्पर्धक एकापेक्षा एक आहेत. यात मला वादग्रस्त काहीच वाटत नाही. जर काही जण स्पर्धकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित करत असतील तर मला आश्चर्य वाटत आहे. मी जेव्हा या शोमध्ये आले तेव्हा सर्व स्पर्धकांनी उत्तमोत्तम गाणी सादर केली. त्यांचं गायनकौशल्य पाहून मीच चकीत झाले", असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा: "IPL बंद झाल्याचा राग इंडियन आयडॉलवर काढतायत"; ट्रोलिंगवर आदित्य नारायण व्यक्त

अमित कुमार यांचा आरोप

शोमधील स्पर्धकांची गाणी ऐकून त्यांची स्तुती करा, असं मला सांगण्यात आल्याचं त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवलं. अमित कुमार यांच्या प्रतिक्रियेवर शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण म्हणाला, "अमित कुमारजी या क्षेत्रात माझ्या वडिलांपेक्षाही मोठे आहेत. मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाहीये. त्यांनी याआधीसुद्धा दोन-तीन वेळा शोमध्ये हजेरी लावली होती. पण आता अचानक त्यांना काय झालं ते मला माहित नाही."

Web Title: Indian Idol 12 Anuradha Paudwal Defend Contestants After Amit Kumars

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..