
Video: पवनदीपचा बर्थ डे, अरुणिताच्या चेहऱ्यावर लाली
Tv Entertainment news: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये काही रियॅलिटी शो चा प्रेक्षकवर्ग हा ठरलेला आहे. त्यामध्ये इंडियन आयडॉलचे नाव घ्यावे लागेल. या मालिकेनं मोठ्या प्रमाणावर (Indian Idol Season 12) प्रेक्षकवर्ग तयार केला. पहिल्या सीझनपासून ते बाराव्या सीझनपर्यत इंडियन आयडॉलनं नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य केलं. गेल्या सीझनचा विजेता पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलालच्या (Arunita kanjilal) मैत्रीची चर्चा व्हायरल होत राहिली. त्यामध्ये त्या (pavandeep Rajan) दोघांनाही सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत राहिला. त्याबाबत त्या दोघांनीही नेहमीच मौन बाळगले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चर्चा करण्यासाठी संधी मिळत राहिली. आता पवनदीपच्या बर्थ डे चा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पवनदीपनं आपला जन्मदिन साजरा केला. त्यावेळी त्याचे सर्व जवळचे मित्र उपस्थित होते. त्यामध्ये अरुणिता कांजीलालचाही समावेश होता. पवनदीपनं तो व्हिडिओ त्याच्या इंस्टावरुन शेयर केला आहे. त्यावेळी त्यानं एक खास पोस्टही त्याबद्दल लिहिली आहे. चाहत्यांनी त्या पोस्टवरुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याच्यासोबत क्रुमधील अनेक लोकही सहभागी झाले होते.

Instagram viral reaction
पवनदीपनं 27 एप्रिल रोजी त्याचा जन्मदिन साजरा केला. पवनदीपनं केक कापताच तो पहिल्यांदा अरुणिताला दिला. तिला खाऊ घातला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पवनदीपला दिल्या आहेत. त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. त्या व्हिडिओवर कमेंट देखील आहे. ती म्हणजे हॅपी बर्थ डे रॉक स्टार. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, पहिल्यांदा अरुलाच केक भरवला की काय... पवनदीपचा तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Web Title: Indian Idol 12 Pavandeep Ranjan Happy Birthday Arunita Kanjilal Instagram Celebration Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..