Anu Aggarwal: शो मध्ये बोलावलं आणि.. 'आशिकी' फेम अनु अग्रवालचे 'इंडियन आयडल 13' निर्मात्यांवर गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Idol 13: Aashiqui Fame Anu Aggarwal Is Sad For Getting Cut Out From The Frame Sitting Next To Rahul Roy

Anu Aggarwal: शो मध्ये बोलावलं आणि.. 'आशिकी' फेम अनु अग्रवालचे 'इंडियन आयडल 13' निर्मात्यांवर गंभीर आरोप

indian idol 13: इंडियन टेलिव्हिजन वरील अत्यंत मानाचा समजला जाणारा 'इंडियन आयडल'हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आशिकी फेम अभिनेत्री अनू अग्रवाल यांनी इंडियन आयडलच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे 'इंडियन आयडल १३' हा कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. पण नेमकं झालं काय ते जाणून घेऊया..

(Indian Idol 13: Aashiqui Fame Anu Aggarwal Is Sad For Getting Cut Out From The Frame Sitting Next To Rahul Roy)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: सावध राहा! किरण मानेचा विकासला सल्ला की कानभरणी?

90च्या दशकात आलेला 'आशिकी' हा चित्रपट अजूनही एक अजरामर कलाकृती मानली जाते. या चित्रपटाने प्रचंड यश आणि प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटात अभिनेते राहुल रॉय आणि अभिनेत्री अनू अग्रवाल प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला आता अनेक वर्षे उलटून गेली असली तरी 'आशिकी' फेम अभिनेत्री अनू अग्रवाल पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण आहे 'इंडियन आयडल 13'.

नुकतच 'इंडियन आयडल 13' मध्ये 'आशिकी' विशेष भाग सादर करण्यात आला. यावेळी 'आशिकी'च्या संपूर्ण टीमला बोलावलं होतं. अनू अग्रवाल आणि राहुल रॉय यांच्यासह दीपक तिजोरी, कुमार सानू ही उपस्थित होते. पण यावेळी अनू यांना पुरेसे महत्व मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांनी निर्मात्यांवर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

अनू अग्रवाल (Anu Aggarwal Indian Idol 13) यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की, या शो मध्ये मीही सहभागी झाले होते. मी राहुल आणि दीपकच्या शेजारीच बसले होते. पण निर्मात्यांनी अशा पद्धतीने त्याचे संकलन केले की मी दिसलेच नाही. मला जाणीवपूर्वक टीव्हीवर दाखवलं गेलं नाही. या गोष्टीने मी प्रचंड अस्वस्थ झाले. मला याचा गवगवा करायचा नाहीय पण ही गोष्ट चांगलीच खटकली.

पुढे त्या म्हणाल्या, 'मी या शोच्या मंचावर आले तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी या कार्यक्रमात बरच प्रेरणा देणारं बोलले. मला तिथे खूप प्रेम मिळालं. पण हे सगळं कुठेच दाखवलं गेलं नाही. कदाचित निर्मात्यांना मी आता मनोरंजन क्षेत्रातून पूर्णतः बाहेर फेकले गेले आहे, हे त्यांना दाखवायचं असेल.'

'इंडियन आयडल'च्य १३ व्या पर्वात नेहा कक्कड़, हिमेश रेशमिया और विशाल ददलानी हे परीक्षक आहेत. हा शो मागेही एकदा वादात अडकला होता. अरुणाचल प्रदेशच्या रितो रिबा या स्पर्धकाचा आवाज दमदार असूनही तिला सिलेक्ट करण्यात आलं नाही. त्यावेळी रितोच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि भेदभाव होत असल्याने 'इंडियन आयडल १३' बंद करा अशी मागणीहि झाली होती.