Indian Idol 13: 'तुम्ही गरीब आहात, घरात खायला नाही, अभिनंदन इंडियन आयडॉलमध्ये तुमचं स्वागत!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Idol 13 trolled

Indian Idol 13: 'तुम्ही गरीब आहात, घरात खायला नाही, अभिनंदन इंडियन आयडॉलमध्ये तुमचं स्वागत!'

Indian Idol 13 Realilty Show: टीव्ही मनोरंजन विश्वात नेहमीच चर्चेत असणारा इंडियन आयडॉलवर आता मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. या शोमध्ये जे स्पर्धक सहभागी होतात त्यांची निवड कशाप्रकारे केली जाते यावरुन एका स्पर्धकानं नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी इंडियन आयडलवर परखड प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉल आणि त्यातील परिक्षक यांच्यावर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी आगपाखड केली आहे. इंस्टावरील त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगून जाणारा आहे.

इंडियन आयडॉलवर झालेल्या त्या आरोपांमुळे रियॅलिटी शोवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्याचे झाले असे की, शोमध्ये सहभागी झालेल्या रिबाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक रिबानं गायलेल्या गाण्यानं परिक्षक खुश झाले होते. त्यामुळे त्याला स्पर्धेत स्थान मिळेल असेही सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. यावरुन आता हा शो स्क्रिप्टेड असून तो बॉयकॉट करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे.

यासगळ्या प्रकरणावरुन जेम्स लिबँग नावाच्या एका युझर्सनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्यानं इंडियन आयडॉलची पोलखोल केली आहे. तो म्हणतो, एक स्पर्धक येतो आपल्या गायकीनं परिक्षकांना प्रभावित करतो. परिक्षक देखील त्याचे कौतूक करतात. आपल्याला असे वाटते की, आता त्याचे सिलेक्शन झाले. दुसरीकडे आणखी एक स्पर्धक येतो, तो जे सांगतो त्यावरुन त्याचे सिलेक्शन होते. हा काय प्रकार आहे हे जेम्सनं त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

indian idol news

indian idol news

दुसऱ्या स्पर्धकानं गायलेलं गाणं तितकसं प्रभावी नसताना देखील त्यानं आपल्या परिस्थिविषयी केलेलं भाष्य परिक्षकांना आवडतं आणि ते त्याची निवड करतात. हे कसं असा प्रश्न व्हिडिओतून विचारण्यात आला आहे. मी फार गरीब आहे, माझ्या घरी खायला काही नाही. माझ्या कुटूंबियांची परिस्थिती बिकट आहे. असे सांगून परिक्षकांना प्रभावित करण्यात येते. अशावेळी त्या स्पर्धकानं गायलेलं गाणं हे चांगल्या सुरावटीत नसलं तरी त्याचे सिलेक्शन होते. असे त्या व्हिडिओमधून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Nikki Tamboli : निक्की तांबोळीची डीप नेक ड्रेसमधील स्टाइल पाहण्यासारखी

इंडियन आयडॉलमध्ये ज्या स्पर्धकांची निवड होते ती टँलेट नव्हे तर त्यांच्या परिस्थितीवरुन होते. अशी टीका करण्यात आली आहे. रियॅलिटी शो ची रियॅलिटी असे त्या व्हिडिओला नाव देण्यात आले आहे. आतापर्यत त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हेही वाचा: Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!