Indian Police Force Trailer: रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'चा जबरदस्त ट्रेलर, मराठी कलाकारांची मांदियाळी

रोहित शेट्टीच्या आगामी 'इंडियन पोलीस फोर्स'चा थरारक ट्रेलर रिलीज
'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये मराठी कलाकार पाडणार छाप
'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये मराठी कलाकार पाडणार छापSAKAL

Indian Police Force Trailer: अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरीज इंडियन पोलिस फोर्सचा अ‍ॅक्शन-पॅक ट्रेलर लाँच करण्यात आला. आगामी वेबसिरीज रोहित शेट्टीच्या आयकॉनिक कॉप युनिव्हर्सच्या पुढच्या अध्यायात मनोरंजन, अ‍ॅक्शन, सस्पेन्स, थ्रिल आणि ड्रामाचा दिसून येतोय.

रोहित शेट्टी निर्मित आणि रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश दिग्दर्शित इंडियन पोलीस फोर्सचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरला अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये मराठी कलाकार पाडणार छाप
Raid 2: IRS अमय पटनायकला नवी टीप! आता कोणाच्या घरावर पडणार रेड? या तारखेला होणार 'रेड 2' रिलीज

'इंडियन पोलीस फोर्स'चा ट्रेलर वेगवेगळ्या शहरांच्या दृश्यांमधून भन्नाट राईडवर घेऊन जातो. ट्रेलरमधली प्रत्येक फ्रेम सस्पेन्स वाढवतो.

शहरावर असलेल्या या वाढत्या धोक्याच्या वेळी पोलिस सुरक्षिततेची जबाबदारी घेणार आहेत. पोलीस ऑफीसर सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक थरारक पाठलाग दाखवला जातो.

हे सर्व एकत्रितपणे बॉम्बस्फोटांमागील सूत्रधारांचा सामना करतात. शहराला येऊ घातलेल्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी धाडस करुन देशभक्तीची प्रगल्भ भावना प्रकट करतात.

देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना सर्वस्व पणाला लावणाऱ्या भारतीय पोलीस अधिकाऱ्यांची निःस्वार्थ सेवा, अतूट वचनबद्धता आणि प्रभावी देशभक्तीला हा ट्रेलर समर्पण करतो.

इंडियन पोलीस फोर्सच्या ट्रेलरमध्ये वैदेही परशुरामी, शरद केळकर, सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाकार झळकत आहेत.

'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये मराठी कलाकार पाडणार छाप
Prashant Damle: "३६५ दिवस राजकारण्यांचा अभिनय सुरुच...", नाट्यपरिषदेच्या व्यासपीठावरुन प्रशांत दामलेंची फटकेबाजी

इंडियन पोलीस फोर्स ही सात भागांची सीरीज 19 जानेवारी 2024 रोजी प्रीमियर होणार आहे. भारतात आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर ही सीरिज पाहता येणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय मल्होत्रा व्यतिरिक्त, शिल्पा शेट्टी कुंद्रा, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंग, मुकेश ऋषी, ललित परिमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com