Jasneet Kaur: इस्टांवर मैत्री, न्यूड फोटो अन् मग... प्रसिद्ध मॉडेलला पोलिसांनी केली अटक..

Jasneet Kaur
Jasneet KaurEsakal
Updated on

इंस्टाग्राम युजर्सना नग्न फोटो पाठवून तिला लोकांना फसवणाऱ्या जसनीत कौरला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. जसनीत कौरवर ब्लॅकमेल करून पैसे घेतल्याचा आरोप आहे. इंस्टाग्रामवर जसनीत कौरला मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात.

जसनीत कौरवर प्रथम एका व्यावसायिकाशी फॉलो रिक्वेस्ट पाठवून संपर्क करायची यानंतर ती व्यावसायिकाला तिचे नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल करायची असा आरोप तिच्यावर आहे.

जसनीतसोबत पंजाब पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, ज्याचे नाव लकी संधू असून त्याच्यावर धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप आहेत. हे दोघे मिळून लोकांना ब्लॅकमेल करून पैसे लुटायचे असा आरोप आहे. यापूर्वी जसनीत आणि लकीने अनेक श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे.

Jasneet Kaur
Celina Jaitly: 'मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर'..तर अभिनेत्रीनं दिली मजेदार उत्तर
Jasneet Kaur
Jasneet Kaur

पंजाबच्या संगरूर येथील रहिवासी असलेल्या जसनीत कौरने तिच्या वडिलांच्या निधनानंतर इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. सुरुवातीला तिचे साधे फोटो पोस्ट करायची. मात्र त्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली नाही.

म्हणून तिने अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली, त्यानंतर तिच्या अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यानंतर ती तिचे सेमी न्यूड व्हिडिओ शेअर करु लागली आणी श्रीमंत लोकांना टार्गेट करु लागली.

ती इन्स्टाग्रामवर मेसेज करून लोकांना त्यांचे नंबर विचारायची आणि फोनवर बोलायची. यानंतर त्यांना अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवून त्याच्यांकडून पैसे उकळायची. पैसे न मिळाल्याने जसमीत त्यांना लकी संधू याच्याकडून धमक्या द्यायची.

Jasneet Kaur
Ghar Banduk Biryani Review: 'बिरयानी' 100 टक्के आवडणार! 'राया पाटील एकटा नडला, सगळ्यांना भिडला...'
Jasneet Kaur
Jasneet Kaur

जसनीतने लुधियानाचा व्यापारी गुरबीरला जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. ती गुरबीरला ब्लॅकमेल करू लागली. त्यानंतर तिनं व्यावसायिकाकडून एक कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुरबीरने मोहालीमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

एवढे करूनही जसनीत थांबली नाही. ती गुरबीरला गुंडांच्या धमक्या देऊ लागला. हे पाहून गुरबीर लुधियानाच्या मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

Jasneet Kaur
Nagraj Manjule-PSI Pallavi Jadhav: जेव्हा 'घर बंदुक बिरयानी' मधील 'राया' खऱ्या दंबग ऑफिसरला भेटतात...आणि मग..

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पोलिसांनी जसनीतकडून एक बीएमडब्ल्यू आणि ₹75 लाख जप्त केले आहेत. लकी संधूची चौकशी केल्यावर असे आढळून आले की त्याचे अनेक गुंडांशी संबंध होते, जे लकीच्या सांगण्यावरून लोकांना धमकावत असत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com