esakal | International Dance Day: साऊथचा नाद नाय... कधीपण, कुठंपण, कितीपण

बोलून बातमी शोधा

international dance day 5 tamil actors who are equally great dancers

International Dance Day: साऊथचा नाद नाय... कधीपण, कुठंपण, कितीपण

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - डान्सच्या बाबत बॉलीवूड आणि टॉलीवूडची नेहमीच तुलना केली जाते. बॉलीवूडमध्ये ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर, यांच्या डान्सबाबत कायम चर्चा असते. 90 च्या दशकात मिथून चक्रवर्ती आणि गोविंदाचाही मोठा दरारा होता. जागतिक डान्स डे च्या निमित्तानं दोन्ही चित्रपट क्षेत्रातील प्रसिध्द डान्सर बाबत बोलायचे झाल्यास साऊथपुढे बॉलीवूडचा निभाव लागणं कठीण असल्याचे दिसून आले आहे. आजही बॉलीवूडमध्ये जे कोरिओग्राफर आहेत त्यातील अनेकजण टॉलीवूडचे आहेत. डान्स डे च्या निमित्तानं साऊथच्या काही डान्सरचा घेतलेला आढावा. आता आपण अशा 5 टॉलीवूड डान्सरच्या बाबतीत जाणून घेणार आहोत ज्यांच्या सिग्नेचर स्टेप आयडियल झाल्या आहेत.

1. थलापती विजय - मास्टर या चित्रपटात विजयनं जो डान्स केला आहे त्याला तोड नाही. त्याच्या त्या डान्सवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता. आपल्या आगळ्या वेगळ्या डान्सिंग स्टाईलनं त्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा तो चित्रपटात केवळ भारतातच नाही तर जगात सर्वाधिक कमाई करणारा कोरोना काळातील चित्रपट ठरला आहे. विजयच्या अनेक गाण्यावरील स्टेप्स मोठ्या प्रमाणात फॉलो केल्या जातात.

2. सिलाम्बरासन - तामिळ अभिनेता असणा-या सिलाम्बरासनंची हवा आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्सही आहे. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या कुठ्ठु या चित्रपटात सिलाम्बरासनंच्या डान्सनं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पोट्टू टाकु हे गाणं फेमस झालं होत. त्या गाण्यात त्याच्या जोडीला राम्या कृष्णन होती.

3. धनुष - धनुषला काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलं. तो जसा सर्वोत्तम अभिनेता आहे तसाच तो बेस्ट डान्सरही आहे. त्याच्या डान्सचे फॅन केवळ टॉलीवूड, बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मारी 2 मध्ये त्याच्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. धनुषच्या डान्सच्या स्टेप्स प्रसिध्द आहे.

4. जयम रवि - भरतनाट्यम हा तसा अवघड नृत्यप्रकार आहे. मात्र जयमनं त्या नृत्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यासाठी तो प्रसिध्दही आहे. तो ज्यावेळी त्याप्रकारातील डान्स करतो तेव्हा त्याच्या स्टेप्स पाहण्यासारख्या असतात.

5. शंतनु - अभिनेता म्हणून शंतनु हा प्रसिध्द आहे. मात्र तसा तो डान्सर म्हणूनही सर्वांना परिचित आहे. सरकराटी मध्ये त्यानं जो डान्स केला होता त्यासाठी त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. सोशल मीडियावर त्याच्या त्या डान्सची चर्चा होत असते. ज्यावेळी त्याचा डान्स आपण पाहतो तेव्हा तो अभिनेता नसता तर प्रसिध्द कोरिओग्राफर झाला असता असे वाटल्यावाचून राहत नाही.