esakal | Womens Day 2021: जरीन म्हणे, बाई होणं सगळ्यात भारी, पाहिजे ते मिळवू शकतो

बोलून बातमी शोधा

international womens day 2021 zareen khan gives important message to all women}

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तिनं केलेलं वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे,​

Womens Day 2021: जरीन म्हणे, बाई होणं सगळ्यात भारी, पाहिजे ते मिळवू शकतो
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  सलमाननं ब्रेक दिला आणि तिला सगळे ओळखायला लागले हे जरी खरे असले तरी जरीन खानच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली होती. हे सांगायला हवे. काही दिवसांपूर्वी तिला एका विद्यापीठानं डॉक्टरेटची पदवीही दिली. त्यामुळे जरीनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सोशल मीडियावर जरीन मोठ्या प्रमाणात प्रसिध्द आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. जरीन खान सध्या चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एक वक्तव्य केलं आहे. ते व्हायरल झाले आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तिनं केलेलं वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, तिनं म्हटलं आहे की हा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे. माझे सर्व महिलांना सांगणे आहे की त्यांनी हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला पाहिजे. त्याची गरज आहे. महिला सक्षमीकरण आपण म्हणतो मात्र यादिवशी त्याचे महत्व आणखी अधोरेखित होते. हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या कुणाला तसे वाटत नाही त्यानं गांभीर्यानं सध्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा. देशभरात महिला दिनाच्या दिवशी देशभरात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

यादिवशी अशा काही महिलांच्या आठवणींना त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला जातो ज्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. यावेळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जरीन खाननं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सांगितले आहे की, सगळ्या महिलांना माझे सांगणे आहे, एक महिला म्हणून आपण आपले जीवन जगायला हवे. हे दिवस आनंदोत्सव म्हणून साजरे केले पाहिजेत. मला असे वाटत नाही की केवळ एकच दिवस म्हणून तो सेलिब्रेट करावा. महिला होणं ही एक सन्मानाची बाब आहे. प्रत्येकाला तो दिवस सेलिब्रेट करता यायला हवा.

महिला होणं ही एक शक्तिशाली गोष्ट आहे.  तो एक सन्मान आहे. हे प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवावं.  माझं महिलांना एवढेच सांगणे आहे की, त्यांनी आपले एक ध्येय ठेवावे. त्यानुसार वाटचाल करावी. त्याशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नाही. महिला होणं हा एक शक्तिशाली अनुभव आहे. त्यामुळे आपण काहीही प्राप्त करु शकतो.