Ira Khan Wedding: आमिर खानने गाणं गाऊन केली लेकीची पाठवणी, उदयपूरमध्ये आयरा - नुपूरचं थाटामाटात लग्न

आमिरची लेक आयरा - नुपुरने केलं थाटामाटात लग्न
ira khan and nupur shikhare wedding at udaipur aamir khan sing emotional song video viral
ira khan and nupur shikhare wedding at udaipur aamir khan sing emotional song video viral SAKAL

Ira Khan Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून आयरा - नुपुरच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी आयरा - नुपुरने कोर्ट मॅरेज करत एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं. या लग्नाला मोजकेच कुटुंबिय आणि नातेवाईक उपस्थित होते.

अशातच आयर - नुपुर या दोघांनी काल उदयपूरमध्ये थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय. यावेळी आमिरने पुर्वपत्नी किरण रावसोबत गाणं गाऊन सर्वांचं मन जिंकलं.

ira khan and nupur shikhare wedding at udaipur aamir khan sing emotional song video viral
Shiv Sena MLA Disqualification Result: "हम लड़ेंगे साथी... हम लड़ेंगे...!" शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यावर मानेंची पोस्ट चर्चेत

आमिरने गाणं गाऊन केली लेकीची पाठवणी

आयरा - नुपुरचा लग्नातला एक व्हिडीओ समोर आलाय. यात स्टेजवर आमिर खानने पुर्वपत्नी किरण रावसोबत जुनी बॉलिवूड गाणी गाऊन सर्वांचं मन जिंकलं.

प्यार दिवाना होता है, पल पल दिल के पास अशी गाणी गाऊन आमिर भावूक झालेला दिसला. आमिरच्या या गाण्यात किरणने त्याला साथ दिली.

आयरा - नुपुरचं लग्न

आमिर खानची लेक आयरा खानने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न केले आहे. या लग्नात आमिर खानसोबत त्याची पुर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण रावही दिसले. सर्वांनी नवविवाहीत दाम्पत्याला आशिर्वाद दिला.

उदयपूरमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नात आयरा पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि त्याला मॅचिंग ब्लेझर परिधान करत नुपुरही सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

आयरा - नुपुरच्या कोर्ट मॅरेजचीही चर्चा

काही दिवसांपुर्वी आमिर खानची लेक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरे यांनी एकमेकांशी कोर्ट मॅरेजच्या माध्यमातून लग्न केलं. आयरा - नुपुरच्या फोटो - व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय.

या लग्नाची एकच चर्चा झाली ती म्हणजे नुपुरने परिधान केलेल्या ड्रेसची. नुपुर शॉर्ट्स आणि काळ्या बनियानमध्ये जॉगिंग करत लग्नाच्या मिरवणुकीसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता. त्यामुळे नुपुरची अनेकांनी मस्करी केली. आता लग्नानंतर आयराने त्याची बाजू घेत ट्रोलर्सची तोंडं बंद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com