TMKOC Daya Bhabhi: वाद अन् आरोपाच्या सत्रात तारक मेहताच्या मध्ये दयाबेन परतणार

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सगळ्यांची लाडकी दयाबेन मालिकेत परतत आहे.
Is Disha Vakani, AKA 'Dayaben' From 'TMKOC' Coming Back To The Show This 'Diwali' After 6-Year-Gap?
Is Disha Vakani, AKA 'Dayaben' From 'TMKOC' Coming Back To The Show This 'Diwali' After 6-Year-Gap? SAKAL

TMKOC Daya Bhabhi Retrun: तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका प्रेक्षकांच्या आवडीची. पण सध्या मात्र या मालिकेला ग्रहण लागल्यासारखे झालंय. मालिका सोडणाऱ्या अनेक कलाकारांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेवर आरोप लावले.

कोणी लैंगिक छळाचा आरोप केला तर कोणी सेटवर अपमानास्पद वागणुक मिळाली म्हणुन नाराजी व्यक्त केली. आता या सर्व आरोपांच्या सत्रात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सगळ्यांची लाडकी दयाबेन मालिकेत परतत आहे.

(Is Disha Vakani, AKA 'Dayaben' From 'TMKOC' Coming Back To The Show This 'Diwali' After 6-Year-Gap?)

Is Disha Vakani, AKA 'Dayaben' From 'TMKOC' Coming Back To The Show This 'Diwali' After 6-Year-Gap?
Ravindra Mahajani: रविंद्र महाजनींच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधुन महत्वाची माहिती उघडकीस

दयाभाभी परत येतेय

वास्तविक दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ ला प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही. चाहते त्याला खूप मिस करत आहेत.

मध्यंतरी दिशा वाकानीने ही मालिका सोडल्याचे वृत्त होते आणि निर्माते तिच्या जागी नवीन चेहरा शोधत आहेत, अशाही बातम्या येत होत्या. मात्र, आता दिशा वाकानी शोमध्ये परत येऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.

पिंकविलाच्या बातमीनुसार, दिशा वाकानी यावर्षी दिवाळीपर्यंत शोमध्ये परत येऊ शकते. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मात्र, आतापर्यंत या वाहीनी किंवा मालिकेच्या निर्मात्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मालिकेत सध्या कोणता ट्रॅक

तारक मेहता का उल्टा चष्मा शोच्या ताज्या कथानकाबद्दल बोलायचे तर जेठालाल दयाबेनला खूप मिस करत आहेत. त्याला दयाला परत गोकुळधाममध्ये पहायची आहे. जेठालाल दया परतण्याबाबत ठाम आहे.

यावर सुंदरने दया लवकरच गोकुळधाममध्ये दिसणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दयाभाभी म्हणजेच दिशा वाकानी पुन्हा शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Is Disha Vakani, AKA 'Dayaben' From 'TMKOC' Coming Back To The Show This 'Diwali' After 6-Year-Gap?
Meena Kumari Biopic: मीना कुमारीचा बायोपीक अडचणीत, कुटूंबाने दिला कायदेशीर कारवाईचा ईशारा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही शो 2008 पासून छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. या शोमध्ये प्रत्येकाची व्यक्तिरेखा इतकी लोकप्रिय झाली आहे की ते त्यांचे स्वतःचे फॅन फॉलोइंग बनले आहेत. दयाबेनचं पात्रही त्यातलंच एक.

दिशा वाकाणीने तिच्या आवाजासाठी आणि दयाबेनच्या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळवले आहे. गेल्या 6 वर्षांपासून ती 'तारक मेहता'पासून दूर आहे आणि चाहत्यांचे डोळे तिला पुन्हा दयाबेनच्या भूमिकेत पाहण्यासाठी आसुसलेले आहेत, पण आता तसे होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com