esakal | समंथा-नाग चैतन्य घेणार घटस्फोट? नागार्जुन म्हणाले..
sakal

बोलून बातमी शोधा

समंथा-नाग चैतन्य घेणार घटस्फोट? नागार्जुन म्हणाले..

समंथा-नाग चैतन्य घेणार घटस्फोट? नागार्जुन म्हणाले..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मनोरंजनविश्वातील काही नात्यांविषयी अचूक अंदाज बांधणं कठीण असतं. दशकाहून अधिक वर्षे लग्नबंधनात राहिल्यानंतरही सेलिब्रिटींनी घटस्फोट घेतल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. आता प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार समंथा अक्किनेनी Samantha Ruth Prabhu आणि तिचा पती नाग चैतन्य Naga Chaitanya विभक्त होणार असल्याचं कळतंय. नागार्जुन अक्किनेनी यांचा मुलगा आणि सून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत. समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून 'अक्किनेनी' हे आडनाव काढून टाकलं, तेव्हापासून या चर्चांना सुरुवात झाली. इतकंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या नागार्जुन Nagarjuna यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलासुद्धा ती उपस्थित नव्हती. कौटुंबिक कार्यक्रमातील तिच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. समंथा आणि नाग चैतन्य यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आता नागार्जुन प्रयत्न करत असल्याचं समजतंय.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार घटस्फोटाच्या चर्चांवर नागार्जुन म्हणाले, "नाग चैतन्यने कधीही त्याच्या पत्नीची फसवणूक केली नाही. याउलट, २०१७ साली लग्न केल्यापासून तो नेहमीच एक प्रेमळ पती म्हणून वागला आहे. वैवाहिक आयुष्यातील कोणत्याही नियमाचं, वचनाचं उल्लंघन त्याने केलं नाही. मजिली या चित्रपटात त्याला ऑनस्क्रीन पत्नीसोबत (समंथा) रागाने वागावं लागलं होतं. असं असतं तरी आपल्या पत्नीसाठी कॅमेरात द्वेषाने पाहणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. आता जेव्हा त्याला समंथासोबत मतभेद दूर करण्यास सांगितलं जातंय, तेव्हा त्याला नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये.

हेही वाचा: 'सैराट'मधला परश्या की कबीर सिंग? नव्या लूकवर चाहते फिदा

घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र वैवाहिक आयुष्यातील मतभेद मिटवण्यासाठी समंथा आणि नाग चैतन्य हे सल्लागारांकडे आणि कौटुंबिक न्यायालयात गेल्याचंही म्हटलं जातं आहे. 'लव्ह स्टोरी २०२१' या चित्रपटाच्या शूटिंगपासून या दोघांमध्ये वाद सुरु झाले. साईसोबत नाग चैतन्यची जवळीक वाढल्याने वैवाहिक आयुष्यात समंथासोबत वाद सुरू झाले अशी चर्चा आहे. या चित्रपटात नाग चैतन्य आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.

loading image
go to top