
ईशा केसकरच्या आजीचे निधन; पोस्ट शेअर करत आठवणींना दिला उजाळा
प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. दोन दिवसांपूर्वी ईशाची आजी शीला पुरुषोत्तम दातार यांचे निधन झाले. तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती. ईशाने तिच्या बालपणीचा आजींसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, 'शीला पुरुषोत्तम दातार 04/01/1939 - 28/08/2021'. तसेच ईशाने आई आणि आजींसोबतचा फोटो देखील शेअर केला. ईशाने बालपणीचा शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची आजी तिला ओवाळताना दिसत आहे. हे फोटो शेअर करून ईशाने आजींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Isha Keskar
कुटुंबासोबत तसेच मित्रमैत्रींसोबतचे फोटो ईशा सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. ईशाने 'जय मल्हार' या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील ईशाच्या अभिनयामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये शनाया ही भूमिका साकारली. या मालिकेमध्ये अनिता दाते आणि अभिजीत खांडकेकर या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
हेही वाचा: 'माझा होशील ना' मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; गौतमीची भावनिक पोस्ट
ईशाने ‘वि आर ऑन, होऊन जाऊ द्या’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिच्या स्टइलमुळे आणि हटके अंदाजामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे.