इश्‍कबाज नंबर 1 

संकलन : भक्ती परब
सोमवार, 17 एप्रिल 2017

नुकतंच इश्‍कबाज मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत आठवं स्थान पटकावलंय. बार्कच्या 14 व्या आठवड्यातील रेटिंगनुसार गेल्या आठवड्यात अकराव्या स्थानी असलेली इश्‍कबाज ही मालिका 8 व्या स्थानी पोहोचलीय. त्यांना 2.4 इतकं रेटिंग मिळालंय. आता तुम्ही म्हणालं की, मग हे नंबर 1 कसे काय? तर त्याचं झालंय असं की, ही मालिका अमेरिकेत नंबर 1 ची मालिका ठरलीय. सध्या या मालिकेत शिवाय सिंग ओबेरॉय आणि अनिकाची प्रेमकथा खूप छान फुलताना दाखवलीय. त्यामुळे या मालिकेचे जगभरातील चाहते जाम खूश आहेत. ते ट्विटरवरून लेखिका हरनीत सिंग यांना एपिसोड कसा असावा?

नुकतंच इश्‍कबाज मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत आठवं स्थान पटकावलंय. बार्कच्या 14 व्या आठवड्यातील रेटिंगनुसार गेल्या आठवड्यात अकराव्या स्थानी असलेली इश्‍कबाज ही मालिका 8 व्या स्थानी पोहोचलीय. त्यांना 2.4 इतकं रेटिंग मिळालंय. आता तुम्ही म्हणालं की, मग हे नंबर 1 कसे काय? तर त्याचं झालंय असं की, ही मालिका अमेरिकेत नंबर 1 ची मालिका ठरलीय. सध्या या मालिकेत शिवाय सिंग ओबेरॉय आणि अनिकाची प्रेमकथा खूप छान फुलताना दाखवलीय. त्यामुळे या मालिकेचे जगभरातील चाहते जाम खूश आहेत. ते ट्विटरवरून लेखिका हरनीत सिंग यांना एपिसोड कसा असावा? याविषयी सूचना करत असतात आणि त्यांच्या मनासारखं झालं की लेखिकेचे आभार मानायलाही ते विसरत नाहीत.

निर्माती गुल खान याविषयी म्हणाली की, आमची मालिका सातत्याने गेले काही महिने अमेरिकेमध्ये नंबर 1 ची मालिका ठरलीय आणि हा एक रेकॉर्ड आहे. भारतीय मालिकांच्या इतिहासात असं हे पहिल्यांदाच घडतंय. निर्माती या यशामुळे खूश असली तरी या मालिकेतील कलाकार मात्र काहीसे नाराजच आहेत. त्यांची भारतीय प्रेक्षकांसारखीच ते भारतात नंबर 1 ठरावेत, अशी इच्छा आहे. त्यांनाही असं वाटतंय की, भारतात नंबर 1 ठरलो तरच खरे इश्‍कबाज. 
 

Web Title: Ishqbaaz Makes A Grand Entry Into The TRP Charts!