
Jab We Met 2 News: शाहीद कपूर - करीना कपूर यांचा २००७ ला आलेला जब वी मेट सिनेमा खुप गाजला. आजही या सिनेमाचे खुप फॅन आहेत. शाहीद - करीनाची केमिस्ट्री या सिनेमामुळे प्रचंड गाजलं.
जब वी मेट मधील आदित्य - गीतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केलीय. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की आवडीने पाहिला जातो. अशातच जब वी मेटच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी म्हणजे जब वी मेटचा सीक्वेल येतोय. आणि या निमित्ताने शाहीद - करीना १६ वर्षांनी एकत्र येणार असल्याची दाट शक्यता आहे.
जब वी मेट सीक्वेलची घोषणा
रिपोर्ट्सनुसार, अष्टविनायकचे मालक राज मेहता या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स बॅनरखाली करणार आहेत. गंधार ग्रुपने 2021 मध्ये गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून मनोरंजन उद्योगात प्रवेश केला.
या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक इम्तियाज अली 'जब वी मेट'च्या सिक्वेलचे दिग्दर्शनही करू शकतात, अशीही माहिती मिळाली आहे.
शाहीद - करीना पुन्हा एकत्र?
मात्र, 'जब वी मेट २' बाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र करीना कपूर खान आणि शाहिद कपूर या चित्रपटासाठी एकत्र येऊन 'गीत' आणि 'आदित्य' या भूमिकेत पुन्हा दिसणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय या दोघांशिवाय नव्या कलाकारांना घेऊन जब वी मेट 2 ची निर्मिती होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
खरंच जब वी मेट चा सीक्वेल येईल का? शाहीद कपूर म्हणाला...
'जब वी मेट' सिनेमा या वर्षाच्या सुरुवातीला २०२३ मध्ये व्हॅलेंटाईन डे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. शाहिद कपूरने काही दिवसांपुर्वी जब वी मेटच्या सीक्वेलबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता, "जब वी मेट 2 येणं हे खरोखरच त्या स्क्रिप्टच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणून जर एखादी स्क्रिप्ट आहे जी सिक्वेलची मागणी करते आणि मला वाटते की त्या स्क्रिप्टमध्ये आधीच्या सिनेमापेक्षा काहीतरी चांगलं आहे. तर सीक्वेल नक्कीच झाला पाहीजे.
शाहीद पुढे म्हणाला, "जर मला असं आढळलं की पुढचा भाग आधीच्या यशस्वी भागाचा फक्त वापर करुन स्क्रीप्टमध्ये मार खात आहे, तर मी नाही करणार"
जर जब वी मेट 2 आला आणि त्यात शाहीद - करीना असले तर नक्कीच सिनेप्रेमी चाहत्यांसाठी ही पर्वणी असेल.