Jacqueline Fernandez: ऑस्करपूर्वीच पसरली जॅकलिनची जादू...अभिनेत्रीचा हा चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jacqueline fernandez

Jacqueline Fernandez: ऑस्करपूर्वीच पसरली जॅकलिनची जादू...अभिनेत्रीचा हा चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत

ऑस्कर 2023 सुरू होणार असून या अवॉर्ड शोबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यावेळी ऑस्करच्या शर्यतीत भारतातील तीन चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या एका चित्रपटालाही नामांकन मिळाले आहे, जो परदेशी चित्रपट आहे.

यानिमित्ताने, अभिनेत्री अवॉर्ड फंक्शनचा भाग होण्यासाठी अमेरिकेत पोहोचली आहे आणि अलीकडेच तिने तिच्या टीमसोबत वेळ घालवला आहे. यादरम्यानचे फोटोही अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

ट्विटरवर जॅकलिन फर्नांडिसने प्री-ऑस्कर डिनरदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या 'टेल इट लाइक अ वुमन' चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे. यादरम्यान ती ब्लू कलरच्या आउटफिटमध्ये आहे.

तिने मॅचिंग ब्रॅलेटसह नेव्ही ब्लू कलरचा पँटसूट घातला आहे. तसेच तिने हाय हिल्स घातल्या आहेत आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. ही अभिनेत्री मिनिमल मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा चित्रपट एवढा मोठा पल्ला गाठून अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, याचा आनंद अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये जॅकलिन अनेक कलाकारांसोबत आहे. यात जपानी मॉडेल अॅनी वॅटनेब, अभिनेत्री मीरा सोर्विनो, भारतीय फॅशन डिझायनर फाल्गुनी, शेन पीकॉक आणि फिल्ममेकर अँड्रिया एरवोलिनो देखील दिसत आहेत.

फोटो शेअर करण्यासोबतच जॅकलीनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'टेल इट लाइक अ वुमन टीमसोबत आणि काही सुंदर लोकांसोबत प्री ऑस्कर डिनर.' यावेळी चाहते जॅकलिनला शुभेच्छा देत आहेत आणि तिच्या आउटफिटचे कौतुकही करताना दिसत आहेत.

टेल इट लाइक अ वुमन बद्दल बोलायचे तर हा २०२२ साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता ज्यामध्ये अनेक लघुपटांचा समावेश होता. जगभरातील वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे, ज्यामध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक लीना यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. या चित्रपटात एकूण 7 लघुकथा आहेत ज्या जगभरातील 7 महिला दिग्दर्शकांनी बनवल्या आहेत.

जॅकलीनच्या चित्रपटाला त्याच सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे ज्यामध्ये एसएस राजामौली यांचा चित्रपट RRR देखील नामांकित आहे. त्यांच्या चित्रपटातील अप्लॉज या गाण्याचा या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. टॉप गन मॅव्हरिक, ब्लॅक पँथर आणि एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स या चित्रपटांची नावेही या श्रेणीत समाविष्ट आहेत. आता या श्रेणीत कोणता चित्रपट जिंकतो हे लवकरच कळेल.

टॅग्स :Jacqueline Fernandez