Jacqueline Fernandez : 'तो जेलमधूनही मला सारखा त्रास देतोय'! जॅकलीननं सुकेशच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे घेतली धाव

सुकेश मला खूप त्रास देतो आहे. त्याच्या नावानं जेलमधून मला धमक्याही (Jacqueline Fernandez approaches Delhi Police Commissioner) येत आहेत.
Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही पुन्हा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिनं सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन आणि सुकेश हे ईडीच्या रडारवर आहेत. जॅकलीनची देखील त्या प्रकणात चौकशी झाली आहे.

सुकेश मला खूप त्रास देतो आहे. त्याच्या नावानं जेलमधून मला धमक्याही (Jacqueline Fernandez approaches Delhi Police Commissioner) येत आहेत. अशी तक्रार आता जॅकलीननं दिल्ली पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी देखील जॅकलीननं तिच्या एका मुलाखतीतून तिनं सुकेशबाबत अनेक खुलासे केले होते.

जॅकलीननं दिल्ली पोलीस कमिशनर संजय अरोरा यांच्याकडे महाठग (Jacqueline Fernandez and sukesh chandrashekhar) सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तो मला मानसिक त्रास आणि धमक्या देत असल्याचे जॅकलीननं म्हटले आहे. यापूर्वी देखील सुकेशनं जॅकलीनच्या नावानं अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यानं जॅकलीन आणि तिच्या कुटूंबियांना काही पैसे दिल्याचेही दिसून आले आहे. सुकेशनं काही महागडे गिफ्टस देऊन जॅकलीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर सुकेशनं जेलमधून जॅकलीनप्रती आपलं प्रेमही व्यक्त केले होते. जॅकलीननं सुकेशविषयी पोलिसांना दिलेली माहिती सुकेशला आवडली नसल्यानं त्यानं त्याबाबत जॅकलीनप्रती नाराजी व्यक्त केली होती. ती पत्रंही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Jacqueline Fernandez
Kiran Rao: 'मला त्याची 'एक्स वाईफ' का म्हणता', किरण राव एवढी का संतापली?

जॅकलीननं म्हटले आहे की, मी एक जबाबदार नागरिक आहे. सुकेशनं यापूर्वी मला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. सुकेश हा जेलमध्ये असून देखील मला कसा काय त्रास देऊ शकतो, पण त्यानं मला प्रचंड मानसिक त्रास दिल्याचे जॅकलीननं म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com