'माझी संपत्ती...'; मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन स्पष्टच बोलली

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात ईडीनं जॅकलीनचे नावही चार्जशीटमध्ये दाखल केले होते. तिची तब्बल ७.२७ करोडची संपत्तीही जप्त केली गेली होती.
Jacqueline Fernandez Claims to pmla fixed deposit is her own income during sukesh chandrashekhar money laundring
Jacqueline Fernandez Claims to pmla fixed deposit is her own income during sukesh chandrashekhar money laundringGoogle

Jacqueline Fernandez सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग केससंदर्भात(Money Laundring Case) बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. जॅकलीनची जवळपास ७.२७ करोडची संपत्ती जप्त केली गेली आहे. या प्रकरणात आता जॅकलीन फर्नांडीसने पीएमएलएच्या अधिकाऱ्यांकडे साक्ष नोंदवल्याचं समोर येत आहे. ज्या अंतर्गत अभिनेत्रीनं स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की माझ्या संपत्तीचा कोणत्याही आरोपाशी काही संबंध नाही. ही माझी स्वतःची संपत्ती आहे.(Jacqueline Fernandez Claims to pmla fixed deposit is her own income during sukesh chandrashekhar money laundring)

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस खूप दिवसांपासून फसलेली आहे. यादरम्यान ईडी तर्फे दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये अभिनेत्रीचे नाव सामिल करण्यात आले आहे. ज्यामुळे जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणीत वाढ झाली आहे. यादरम्यान जॅकलीननं आता आपल्या जप्त केल्या गेलेल्या ७.२७ करोडच्या संपत्तीविषयी पीएमएलच्या अधिकाऱ्यांकडे आपली साक्ष नोंदवली आहे. एएनआयने केलेल्या ट्वीटनुसार जॅकलीननं ती साक्ष नोंदवताना त्यात म्हटलं आहे की,''माझ्या संपत्तीचा माझ्यावर लावलेल्या आरोपाशी काही संबंध नाही. माझ्याकडे जो पैसा आहे तो सर्व कायदेशीररित्या कमावलेला आहे,जो मनी लॉन्ड्रिंग केसमधील आरोपी सुकेश चंद्रशेखरला मी भेटण्याआधी पासून माझ्याकडे होता.''.

Jacqueline Fernandez Claims to pmla fixed deposit is her own income during sukesh chandrashekhar money laundring
'RRR' की 'The Kashmir Files'; ऑस्करला कोण जाणार, काय म्हणतायत एक्सपर्ट्स?

मनी लॉन्ड्रिंग केसमधील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचे कितीतरी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासंदर्भात समोर आलेल्या बातम्यांमध्ये दावे केले गेले होते की जॅकलिन आणि सुकेश रीलेशनशीपमध्ये आहेत,पण त्यानंतर अभिनेत्रीनं या बातमीचं खंडन केलं होतं. दुसरीकडे ईडीने जेव्हा या प्रकरणात तपास सुरु केला तेव्हा २१५ करोडच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आरोपी म्हणून समोर आला. तसंच,जॅकलिनला सुकेशने कितीतरी महागडे गिफ्ट्स दिले होते,ज्याकारणाने ईडीच्या निशाण्यावर आता जॅकलीन देखील आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com