esakal | जॅकलिनची दस-यानिमित्त स्टाफला ''कारभेट''
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez gifts staff member a car as Dusshera

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने यंदाच्या दस-यानिमित्ताने तर आपल्या स्टाफ मेंबरला चक्क कार भेट दिली आहे. यामुळे सोशल मीडियातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

जॅकलिनची दस-यानिमित्त स्टाफला ''कारभेट''

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - दसरा आणि दिवाळीला आपल्या सहका-यांना वेगवेगळ्या भेटवस्तु दिल्या जातात. या दिवसाची गोड आठवण यानिमित्ताने राहावी असा त्यामागील उद्देश. दुसरं म्हणजे आपले सहकारी आणि आपल्यातील संवाद कायम राहून त्यांच्यातील कार्यक्षमता वाढीस लागावी अशा हेतूनेही भेटवस्तु देण्याची पध्दत आहे. अनेकजण या औचित्याला धरुन हजारो - लाखों रुपयांच्या भेटवस्तु आपल्या सहका-यांना देतात. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी यासाठी प्रसिध्द आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने यंदाच्या दस-यानिमित्ताने तर आपल्या स्टाफ मेंबरला चक्क कार भेट दिली आहे. यामुळे सोशल मीडियातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तिने कार भेट दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती सहका-यांना दिलेल्या कारच्या पुढे नारळ फोडून पुजा करत आहे. जॅकलिनच्या मुंबईतील एका ऑफीसमध्ये असणा-या कर्मचा-यांना तिने ही कारची भेट दिली आहे. जॅकलिनने दिलेल्या या मोठ्य़ा भेटीमुळे सहका-यांनी तिला धन्यवाद देऊन तिचे मनपूर्वक आभारही मानले आहे.

जॅकलिनने सोशल मीडियावर जो एक व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यात ती वाहतूक पोलीस कर्मचा-यांच्या वेशभुषेत आहे. तिने त्या कारसमोर नारळ फोडून पुजा करावी अशी विनंती तिला सहका-यांनी केली. यावेळी उपस्थितांची मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी केली होती. तेही या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या सहका-यांनी जॅकलिनला तिच्या बॉलीवू़डमध्ये पदार्पणाच्या काळात सहकार्य केले त्यांना तिने ही भेट दिली आहे. तिने नेमक्या कुठल्या आणि किती सहका-यांना कार दिली हे मात्र कळु शकलेलं नाही. योगायोगाने जॅकलिनच्या एका चित्रपटातील वाहतूक पोलीस कर्मचा-याचा एक सीन शुट होत होता. तेव्हा जॅकलिनने ती वेशभुषा करुन सहका-यांना सरप्राईज दिले.

जॅकलिनने याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्य़ात तिने त्या दिवसाबद्दल लिहिले आहे. त्या प्रत्येकाचा रविवार कसा होता, असा प्रश्न तिने विचारला आहे. जॅकलिन येत्या काळात किक च्या 2 -या भागात तसेच सर्कस या रणवीर सिंग च्या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती सैफ आणि यामी गौतमीबरोबर भूत पोलीस या चित्रपटातही झळकणार आहे.