Money Laundering Case: जॅकलिनवर अजूनही टांगती तलवार, जामीन मिळाला पण...

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात आज कोर्टानं जॅकलिनला १५ नोव्हेंबर पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out
Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out Google
Updated on

Jacqueline Fernandez: कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात शुक्रवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या स्पेशल कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अभिनेत्रीला १५ नोव्हेंबर पर्यंत या जामीनाची मुदत वाढवून मिळाली आहे. जॅकलिन अंतरिम जामीनावरच आतापर्यंत बाहेर आहे. (Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out)

Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out
Rasika Sunil: 'पोट्टी रेतीत लोळून राईली, बाप्पा...'; रसिकाच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

या प्रकरणात पुढील सुनावणी आता १५ नोव्हेंबर रोजीच होणार आहे. गेल्यावेळेस कोर्टात सुनावणी दरम्यान अभिनेत्रीनं रेग्युलर जामीनाची मागणी केली होती,ज्यावर ईडीनं आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणातली सुनावणी गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली होती,ज्यानंतर कोर्टानं शुक्रवार पंर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता. आज आलेल्या कोर्टाच्या निर्णयानं जॅकलिनला काहीसा दिलासा मिळाला आहे,कारण कोर्टानं अंतरिम जामीनाची मुदत जॅकलिनला वाढवून दिली आहे. गुरुवारी सुनावणी दरम्यान जॅकलीनने तक्रार केली होती की, ती ईडी जेव्हा चौकशीसाठी बोलवायचं त्या वेळेत हजर व्हायची. परंतु,ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला या केस प्रकरणात खूप त्रास दिला .

Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out
Sonalee Kulkarni: निस्ता गोडवा! अप्सरा की चॉकलेटचा झरा...

तर तिकडे ईडीचं म्हणणं होतं की जॅकलिनला जामीन मिळायला नको कारण तिनं चौकशी दरम्यान सहकार्य केलं नाही. तिच्यासमोर जेव्हा पुरावे सादर केले जायचे तेव्हाच ती बोलायची. तिनं सांगितलं होतं की सुकेशच्या गुन्ह्यांविषयी त्याला भेटल्यानंतर दहा दिवसांतच आपल्याला सुगावा लागला होता.ती एक सर्वसाधारण व्यक्ती नाही,बॉलीवूड अभिनेत्री आहे जिची आर्थिक बाजू मजबूत आहे.

Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out
'कसौटी जिंदगी की' फेम सिद्धांत वीर सुर्यवंशीचं निधन, जीम मध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात तपास करताना जॅकलिनशी असलेल्या त्याच्या कनेक्शनचा छडा लागला होता. सुकेशने केवळ जॅकलिनलाच नाही तर तिच्या घरातील इतरांना देखील लक्झरी गिफ्ट्स दिले आहे. या प्रकरणात नोरा फतेहीचं नाव देखील समोर आलं होतं. सुरुवातीला दोन्ही अभिनेत्री या केसमध्ये साक्षीदार होत्या, पण तपासानंतर ईडीनं जॅकलिनचं नाव आरोपपत्रात दाखल केलं. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेश गुन्हेगार आहे हे जॅकलिनला माहीत होते. तरीदेखील ती त्याच्यात गुंतली. सुकेशच्या सगळ्या गैरकामांबद्दल तिला माहित होते.

Jacqueline Fernandez money laundering case delhi court order on actress regular bail plea is out
Hera Pheri 3 मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री, अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार की केलं रीप्लेस? जाणून घ्या

जॅकलिनच्या वकीलांनी म्हटले होते की ते शेवटपर्यंत लढणार,कारण ती निर्दोष आहे, एवढंच नाही तर केसमधील मुख्य आरोपी सुकेशनं जेलमधून लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की जॅकलिनचं या केसशी काही घेणंदेणं नाही. सुकेशचं म्हणणं आहे की ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते म्हणून तो तिला गिफ्ट्स द्यायचा. यामध्ये जॅकलिनचा आणि तिच्या कुटुंबाचा दोष नाही. ती फक्त माझ्यावर प्रेम करायची. तिला माझ्या कामाशी काहीच घेणं-देण नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com