esakal | जॅकलिनची लाखमोलाची मदत; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

बोलून बातमी शोधा

jacqueline fernandez

जॅकलिनची लाखमोलाची मदत; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडमधील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस Jacqueline Fernandez तिच्या चित्रपटामधील अभिनयाने आणि नृत्याने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकते. आपल्या सौदर्यांने प्रेक्षकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जॅकलिन सध्या समाजातील गरजू लोकांना मदत करत आहे. 'रोटी बँक' या संस्थेच्या माध्यमातून जॅकलिन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोवणार आहे. तसेच फीलाइन या फाउंडेशनसोबत मिळून जॅकलिनने भटक्या जनावरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकलिनने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला या कार्यासाठी शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले आहे. तसेच कोरोना काळात तिने फ्रंटलाइन वर्कर्सनासाठी देखील मदत केली आहे. जॅकलिनने मुंबई पोलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले होते. जॅकलिनने तिच्या या सर्व कार्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (jacqueline fernandez takes initiative to help people and animals during pandemic)

सोशल मीडियानवर जॅकलिनने तिच्या कार्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'आपल्याकडे एकच आयुष्य आहे. त्यात आपण चांगले काम केले पाहिजे. या जगात जे काही आपल्याला लोकांसाठी करता येईल ते आपण केले पाहिजे. मला योलो फाउंडेशन संस्था लाँच करताना खूप आनंद होतोय. या कठिण काळात योलो फाऊंडेशनने अनेक संस्थांसोबत पार्टनरशिप केली आहे. शक्य तितके सामाजिक कार्य आम्ही करणार आहे. या संस्थेचे काम पाहा आणि तुम्हाला शक्य तितकी मदत करा.'

हेही वाचा : लग्नाच्या वाढदिवशीच सखी-सुव्रत कोव्हिड पॉझिटिव्ह

जॅकलिनच्या या मदतकार्याचे अनेक जण कौतुक करत आहेत. तर काहींनी या संस्थेला आर्थिक मदतदेखील केली आहे. याआधी तिने पुरग्रस्तांच्या घरांच्या पुनर्वसनासाठी आणि लहान मुलांना पोषण आहारासाठी मदत केली होती. जॅकलिनला प्राण्यांची देखील खूप आवड आहे. कोरोना काळात भटक्या जनावरांना खाद्य मिळत नाही त्यामुळे अनेदा ते जीव गमावतात. त्यांच्यासाठी अन्नाची सोय देखील जॅकलिन करत आहे.