Jailer Review: बाप 'बाप' असतो, त्याचा नाद करायचा नाय! रजनीचा 'जेलर' एकदम 'किलर'

Rajinikanth Latest Movie: दोन वर्षानंतर रजनीकांत यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Jailer Movie Review Rajinikanth Superstar eskal

Jailer Movie Review Rajinikanth Superstar : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या मोठा कट आऊट्सला दुग्धाभिषेक केला जातो. टॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठी ते देव आहेत.

त्यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. आजवर आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांतून कोट्यवधी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या थलायवाची गोष्टच काही और आहे. हे सगळं का आहे याची प्रचिती जेलरमधून आल्याशिवाय राहत नाही. Jailer Movie Review Rajinikanth Superstar Nelson Dilipkumar Director

दोन वर्षानंतर रजनीकांत यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक आणि रजनी यांचे चाहते या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते. अखेर आज तो प्रदर्शित झाला असून त्यानं कमाल केली आहे.

वयाची सत्तरी पार केलेल्या रजनी यांचा वेगळा अंदाज या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतो. हॉलीवूडमध्ये अॅक्शनपट करणाऱ्या काही अभिनेत्यांची जी एक सिग्नेचर स्टेप किंवा अॅक्शन असते तशी रजनी यांच्या त्या अॅक्शन किंवा स्टाईलची प्रचंड क्रेझ आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

रजनी यांच्या जेलरनं त्यांना पुन्हा एकदा मेगा सुपरस्टार का म्हटले जाते, त्यांना देव म्हणून का पुजले जाते, त्यांच्या चित्रपटांना एवढा प्रचंड प्रतिसाद का मिळतो आणि निर्माते, दिग्दर्शक काही करुन एखादा का होईना चित्रपट त्यांच्यासोबत करायला मिळावा म्हणून का धडपडत असतात याची उत्तरं जेलरमधून मिळतात. रजनी यांनी या चित्रपटामध्ये कमाल केली आहे. त्यांचा गेटअप, लूक, स्टाईल, अॅक्शन हे सारं पाहिल्यावर आपण भारावून जातो.

जेलर पाहून तुम्ही जेव्हा थिएटरमधून बाहेर पडता तेव्हा वेगळ्याच गुंगीत असल्याचे तुम्हाला जाणवतेच. ही कमाल आहे अनिरुद्धच्या संगीताची. तो तुम्हाला पूर्णपणे चक्रावून टाकतो.

गेल्या काही वर्षांपासून अनिरुद्ध हा त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. त्यात उल्लेख करायचा झाल्यास विक्रम, बिस्ट, मास्टर आणि आता तर शाहरुखच्या पठाणला देखील त्यांनेच संगीत दिले आहे. त्यालाही चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

अनिरुद्धचं जबरदस्त म्युझिक, बॅकग्राउंड म्युझिक आणि साउंड डिझायनिंग हे इतकं प्रभावी आहे की, जेलर तुम्हाला कुठेही कंटाळवाणा होत नाही. खासकरुन जितक्या वेळा रजनी यांच्या इंट्रीच या चित्रपटामध्ये तुम्हाला दिसतात त्यावेळी ती वाजणारी सिग्नेचर ट्युन जबरदस्त आहे.

ती एका वेगळ्याच प्रकारचा फिल तुम्हाला करुन देते. जेवढ्या ताकदीचे संगीत आहे तेवढ्याच ताकदीचं छायाचित्रणही आहे. साऊथच्या चित्रपटांचे ते एक खास वैशिष्ट्य राहिले आहे.

 Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Jailer Movie Review Rajinikanth Superstar

रजनीकांत काहीही करु शकतो, एकाच वेळी तो कितीही जणांना मारु शकतो, त्याची पावर काही औरच आहे. हे सारं तुम्हाला जेलरमध्येही दिसेल पण ते तुम्हाला खरं वाटावं किंवा ते तुम्ही ते सहजासहजी मान्य करावं अशा प्रकारचं दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमारचं आहे. तो इतक्या वेगानं सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणतो की, तुम्ही कुठेही रेंगाळत नाही. तुम्हाला कंटाळवाणं होत नाही. याची काळजी त्यानं घेतली आहे. चित्रपटात विनोदी प्रसंग बरेच आहेत. आणि ते योगी बाबू, सुनील यांच्यासारख्या कलाकारांनी दमदारपणे साकारले आहेत.

Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Gadar 2 : तुम्हाला 'गदर 2' कसा वाटला? भारतीय सैन्यासाठी खास स्क्रिनिंग! काय होती प्रतिक्रिया?

जेलरच्या कथानकाविषयी थोडक्यात असं की, मुथूवेल पंडियान (रजनीकांत) हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगाधिकारी म्हणून निवृत्त झालाय. त्याचा मुलगा अर्जून हा एसीपी आहे. तो कर्तव्यदक्ष आहे. बापासारखा मुलगा देखील धाडसी आहे.

त्याला त्याच्या कर्तव्याची जाण आहे. मुथूवेलचं छोटं पण आनंदी कुटूंब आहे. त्यात त्याची पत्नी (राम्या कृष्णन), सून आणि नातु मोठ्या खुशीत आहे. सगळं काही सुरळीत सुरु असताना अर्जूनला अन्नाकोरम मधील एका मंदिरातून सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याचे कळते आणि चित्रपट वेगळ्या वळणाकडे जाऊ लागतो.

Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Jailer Movie Review Rajinikanth Superstar

अर्जून त्या मूर्ती चोरीप्रकरणाचा तपास करु लागतो. तेव्हा त्याला धमक्या यायला सुरुवात होते. शेवटी त्याला काही गुंड पकडून घेऊन जातात. आपल्या मुलाला बड्या गुंडानं धमक्या देऊन त्याचे अपहरण केले आहे. आणि आता त्याच्या जीवाला धोका आहे.

शिवाय कुटूंबावरही मृत्यूची टांगती तलवार असल्याचे मुथूला सांगण्यात येते. अशा प्रसंगात त्याच्यातील पूर्वीचा जेलर जागा होतो आणि तो मुलाला सोडविण्यासाठी जे काही करतो ते बघून आपण चक्रावून जातो.

Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Gadar2 vs OMG2 : ज्यांनी घेतला सनी भाईशी पंगा, झालाय दंगा! पण प्रत्येकवेळी...!

रजनीकांतनं त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांसारखी फाईटिंग या चित्रपटामध्ये केलेली नाही. पण जेवढे काही अॅक्शन सीन केले आहेत ते मात्र तुमच्या मनात छाप उमटवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात स्पेशल आहे ती रजनीची इंट्री..

चित्रपटामध्ये जवळपास चारपेक्षा अधिक वेळा रजनी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपल्या समोर येतो पण त्याचं ते येणं आणि आपल्याला दिसणं हे बाकी कमाल आहे. त्यात अनिरुद्धचं म्युझिक हे एकत्र येणं म्हणजे रजनीचा जेलर आणखी आनंद देऊन जातो.

मुथूला काही करुन आपल्या मुलाला सोडवायचे आहे. त्यासाठी तो आता आपल्या वेगवेगळ्या सोर्सेचा वापर करतो. ते कोण आहेत हे तुम्ही पडद्यावर पाहणं जास्त योग्य अन्यथा प्रेक्षकांचा विरस होण्याची शक्यता जास्त.

याशिवाय रजनीच्या या चित्रपटामध्ये साऊथचे बिग स्टारही आहेत. आपले दोन मराठमोळे कलाकारही त्यात दिसले आहेत. त्यापैकी एकानं तर रजनीसोबत घेतलेली ती इंट्री एकदम कडकच आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफही तुम्हाला यात दिसतो. त्यानं एका गुंडाचीच भूमिका साकारली आहे. मात्र तो मुथूचा हितचिंतक आहे. पूर्वी मुथूवेलनं त्याच्यावर केलेले उपकार हे तो काही विसरलेला नाही. अशावेळी अनेकजण मुथूवलेशी जोडले गेले आहे.

साऊथचा आणखी सुपरस्टार रजनी यांच्यासोबत आहेत. त्यांचे लक्ष्य एकच आहे. मुथूवेलच्या मुलाची सुटका...पण ती सुटका होते का, त्यानंतर मुथूवेल यांना कळालेली ती सगळ्यात धक्कादायक बाब कोणती...त्यानंतर चित्रपटात येणारा सगळ्यात मोठा ट्विस्ट तुम्ही थिटएटरमध्ये जाऊनच पाहा..

Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Kangana Ranaut : 'तो जाम भारीये, त्याची अन् माझी जोडी कशी वाटेल', कंगनाच्या मनात आहे तरी कोण?
Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Jailer Movie Review Rajinikanth Superstar

सध्या मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या घडामोडी होत आहेत. हा महिना तर एकापेक्षा एक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. येत्या दिवसांत होणार आहे. तब्बल २३ वर्षानंतर आता सनी देओलचा गदरही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

अशावेळी रजनीच्या जेलरनं मात्र त्यासगळ्यांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. वय वर्षे ७२ पण तो जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा समोर कुणीही असले तरी त्याला काहीही फरक पडत नाही हे त्याच्या आजवरच्या चित्रपट विक्रमांकडे पाहिल्यावर कळून येते.

Jailer Movie Review Rajinikanth Superstar
Neetu Kapoor Review: माझी गुणी सून! आलियाचा सिनेमा पाहून सासूबाई खुश...

जेलरला आगामी काळात सनीचा गदर, अक्षयचा ओएमजी आणि रणवीरचा राजा और रानी की प्रेम कहानीची फाईट असणार असं बोललं जातंय. पण तुम्ही जेव्हा जेलर पाहून याल तेव्हा तुमचे मत बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की....

--------------------------------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - जेलर

दिग्दर्शक - नेल्सन दिलीपकुमार

कलाकार - रजनीकांत, जॅकी श्रॉफ, सुनील, योगी बाबू, तमन्ना, मोहनलाल

रेटिंग - ****/5

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com