जान्हवीला बाथरुमचा दरवाजा बंद करु द्यायची नाही आई,चेन्नईचं 'ते' घर दाखवत म्हणाली.. Janhvi Kapoor Chennai Home, Shridevi Home | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi Kapoor Chennai Home,Video,Mom Shridevi would not let her lock bathroom

Janhvi Kapoor Home: जान्हवीला बाथरुमचा दरवाजा बंद करु द्यायची नाही आई,चेन्नईचं 'ते' घर दाखवत म्हणाली..

Janhavi Kapoor Home: जान्हवी कपूरने आपल्या चाहत्यांना चेन्नईमधील घराची सफर नुकतीच घडवून आणली. जान्हवीनं सांगितलं की हे चेन्नईतील घर तिची आई श्रीदेवीनं खरेदी केलं होतं,तेव्हा ते खूपच वेगळं होतं.

तिनं सांगितलं की, आईनं निर्णय घेतला होता की ती हे घर माझ्या लग्नानंतर सजवणार. या घरासाठी तिनं जगभरातून अनेक गोष्टी खरेदी करुन आणल्या होत्या. जान्हवीनं आपल्या या व्हिडीओत एक शॉकिंग गोष्ट सांगितली ती म्हणजे श्रीदेवी तिला या घरातील बाथरुमचे दरवाजे बंद करू द्यायच्या नाहीत. (Janhvi Kapoor Chennai Home,Video,Mom Shridevi would not let her lock bathroom)

हेही वाचा: Sara Ali khan Photo: शुभमनच्या गावापर्यंत पोहोचली सारा अली खान?,समोर आलेल्या फोटोनं चर्चेला उधाण

जान्हवी कपूरनं या चेन्नई मधील घराची सफर करताना व्हिडीओत घरातील अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. हे आपल्या आईनं खरेदी केलेलं पहिलं घर आहे असं जान्हवी म्हणाली. या घराच्या एका खोलीत बोनी कपूर देखील काम करताना दिसले. जान्हवीची आत्या आणि इतर पूर्ण कुटुंब त्या घरात दिसत आहेत. जान्हवी म्हणाली की,''आईच्या निधनानंतर या घराचं काम पुन्हा केलं गेलं. जेणेकरुन सगळे एकत्र जमतील आणि आईच्या आठवणीत रमतील''.

जान्हवी या व्हिडीओत सांगत आहे की, हे घर तिला या कारणानं आवडतं कारण या घराशी तिच्या खूप जुन्या आणि नव्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. जान्हवी म्हणाली,''खूप छोट्या आठवणी या घराशी जोडल्या गेल्यात. मला आठवतं की आई माझ्या बाथरुमला लॉक लावू देत नव्हती. तिला खूप भीती वाटायची. तिला वाटायचं की मी बाथरुमला लॉक करुन आतमध्ये माझ्या बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारेन. मला माझ्या बाथरुमला लॉक लावण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे पूर्ण रुम जरी बनून तयार असला तरी माझ्या बाथरुमला अजूनही लॉक लावलेलं नाही''.

हेही वाचा: Shiv Thakare Romantic Photo:काळोखात गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसला शिव,'ते' फोटो पाहून चाहते हैराण

जान्हवीने या सफरी दरम्यान आपल्या घराच्या आतील तिचा आवडता कोपरा, घराच्या आतलं डेकोरेशन,पेंटिंग आणि आर्ट वर्क देखील दाखवलं. घरात श्रीदेवी आणि जान्हवीनं बनवलेली पेंटिग्ज देखील आहेत.