क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत जान्हवी कपूरच्या गाठीभेटी का वाढल्यात? Janhvi Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi Kapoor, Dinesh Karthik

क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत जान्हवी कपूरच्या गाठीभेटी का वाढल्यात?

बॉलीवूड आणि क्रिकेटचं खूप जवळचं नातं आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्री या क्रिकेटर्सच्या गर्लफ्रेंड्स राहिलेेल्या आहेत. अर्थात आता काहीजणींचं ते प्रेम यशस्वी होऊन त्यांनी लग्नगाठही बांधली आहे. विराट-अनुष्का,हरभजन सिंग-गीता बसरा अशी उदाहरणं आहेत की डोळ्यासमोर. पण बऱ्याचदा क्रिकेट या विषयाने सिल्वर स्क्रीनलाही भुरळ घातलेली आपण पाहिलीय. क्रिकेटवरील या सिनेमांनी बॉक्स ऑफिसलाही चांगली कमाई करून दिली आहे. सुशांत सिंग राजपूतचा 'महेंद्रसिंग धोनी' असो की आता-आताचा रणवीर सिंगचा '83' असो,या सिनेमांनी क्लासपासून मासपर्यंत सर्वच वर्गातील सिनेप्रेमींना खूश केले होते. महिला क्रिकेटचाही आंतरराष्ट्रीय पातळीवर दरारा पहायाला मिळतो आहे. मग एखाद्या महिला क्रिकेटरला घेऊन सिनेमा आला तर नवल कशाला. अनुष्का शर्मा झुलन गोस्वामी साकारतच आहे नाही का 'चकदा एक्सप्रेस'मधून. तिच्या पाठोपाठ आता आपली जान्हवी कपूरही(Janhvi Kapoor) 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमात क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

गेल्या वर्षी जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr. and Mrs. Mahi movie) या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच या सिनेमा संदर्भात उत्सुकता होती. या सिनेमात जान्हवी कपूर क्रिकेटरच्या भुमिकेत दिसणार आहे.जान्हवी कपूरने या संदर्भातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती क्रिकेटपटू दिनेश कार्तिक(Dinesh Karthik)सोबतच क्रिकेटची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.या सिनेमात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव एकत्र पहायला मिळणार आहेत. याआधी हे दोघे ‘रुही’ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. तर क्रिकेट शिकण्यासाठी सध्या जान्हवी दिनेश कार्तिककडून क्रिकटचे धडे घेत आहे म्हणूनच या गाठीभेटी वाढल्या आहेत बंर का,बाकी काही नाही.

Web Title: Janhvi Kapoor Plays Cricket With Dinesh Karthik In Mr And Mrs Mahi Bts Photos Shares First Look Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top