'जिम लुकसाठी नाही तर, अभिनयासाठी ओळखा', जान्हवी झाली नाराज !

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

'धडक' गर्ल जान्हवी कपूर तिच्या सिनेमांपेक्षा जिम लुकच्या फोटोमुंळे अधिक चर्चत असते. पण, याच कारणाने जान्हवी नाराज आहे. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने ती नाराज असल्याचा खुलासा केला आहे. जाणून घ्या नक्की काय आहे कारण !

मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची लाइफ ही कितीही म्हणटलं तरी प्राइवेट राहत नाही. आऴडतच्या सेलिब्रिटींच्या लाइफमध्ये काय सुरु असतं हे जाणून घेण्याची चाहत्य़ांना उत्सुकता असते. सेलिब्रिटी आणि त्यांची मुलं म्हणजे स्टार किड यांच्याविषयीही लोकांना खास आकर्षण असते. सेलिब्रिटींच्या लाइफमध्ये लव्ह-अफेअर आणि ब्रेकअपचा सिलसिला तर सुरुच असतो. 'धडक' गर्ल जान्हवी कपूर तिच्या सिनेमांपेक्षा जिम लुकच्या फोटोमुंळे अधिक चर्चत असते. पण, याच कारणाने जान्हवी नाराज आहे. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने ती नाराज असल्याचा खुलासा केला आहे. जाणून घ्या नक्की काय आहे कारण !

मराठीतील सुपरहिट ठरलेला 'सैराट' चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. 'धडक' मधून जान्हवी कपूर आणि इशान खट्टरने पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर खास काही कमाल दाखवू शकला नाही. पण, जान्हवीला यातून चांगली प्रसिद्धी मिळाली. आता ती पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#janhvikapoor snapped at juhu today #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

चित्रपटांपेक्षा जान्हवीला अनेकदा पॅपराझी तिला स्पॉट करतात. जान्हवीचा जिम लुक तर अनेकदा व्हायरल होतो. जान्हवी तिच्या फिटनेससाठी प्रचंड जागरुक आहे.

त्यामुळेच ती जिमवर अधिक लक्ष केंद्रित करते. पण, तिचा जिमचा लुक आणि कपडे यामुळे नेटकरी जान्हवीला अनेकदा ट्रोल करतात. हिंदुस्तान टाइम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवी याच विषयावर बोलली. जान्हवी म्हणाली, ''माझा पहिला सिनेमा 'धडक' जेव्हा रिलिज झाला होता तेव्हा लोकं माझ्याकडे यायचे आणि कामाविषयी बोलायचे, माझं काम त्यांना आवडलं आहे हे सांगायचे. पण, दुसरीकडेच असेही लोक भेटतात जे माझ्या जिम लुकला फॉलो करत आहेत. याचा अर्थ असा की, माझ्या सिनेमांशिवाय मी जिम लुकसाठीही प्रसिद्ध आहे. थोडं विचित्र आहे पण यासाठी मी कोणाला दोष देत नाही.''

सध्या जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. माझे पुढील सिनेमे रिलिज झाल्यानंतर लोकांनी मला माझ्या कामामुळे ओळखावं, जिम लुकमुळे नाही. असं परखड मत जान्हवीने मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं. 

जान्हवी 'दोस्ताना 2' मध्ये झळकणार आहे. शिवाय वरुण धवनसोबत 'मिस्टर लेले' यामध्येही असणार आहे. शिवाय नेटफ्लिक्सच्या 'घोस्ट स्टोरीज' मधूनही ती नुकतीच झळकली. जान्हवी सध्या गुंजन सक्सेना यांच्या 'द कारगिल गर्ल' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवी महिला वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट पुढील वर्षी 13 मार्चला प्रेत्रकांच्या भेटीला येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janhvi Kapoor reacted to the attention she gets on her gym looks