
Javed Akhtar : 'पुन्हा सांगतो जर तुम्ही...' पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांनी भर मैफिलीत सुनावलं...
Javed Akhtar bollywood Lyricist Angry On Pakistan : बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. अख्तर यांना परखड वक्तव्य करणारे गीतकार म्हणूनही चाहते ओळखतात. काहीही झालं तरी आपल्याला जे योग्य वाटते त्यावर ठाम राहणं हा अख्तर यांचा स्वभाव आहे. आता ते एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या चाहत्यांना सुनावणाऱ्या अख्तर यांचे ते उत्तर भारतातील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याचं झालं असं की, जावेद अख्तर हे पाकिस्तानमध्ये फैज अमहद फैज यांच्या नावानं आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना काही चाहत्यांनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या परखडपणाचा परिचय करुन दिला आहे.
Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
उर्दु शायर आणि कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या संमेलनामध्ये चाहत्यांनी अख्तर यांना पाकिस्तानचा द्वेष कमी करा आणि आमच्याबद्दल चांगल्या भावना ठेवा असे म्हटले. तेव्हा मात्र अख्तर यांनी त्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, मी तुमच्याकडे आलो त्याचे निमित्त वेगळे आहे. आम्ही कधीही तुमच्याकडे मुंबईमध्ये झालेल्या २६-११ बद्दल बोलत नाही. आणि भारतातील लोकं तुमच्याकडे कोणती तक्रार करत नसतील तर तुम्ही प्रत्येकवेळी वेगळं काही बोलण्याची गरज नाही.
पाकिस्तानकडून शांततेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी काय केलं पाहिजे असाही प्रश्न अख्तर यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, आपण जोपर्यत एकमेकांवर आरोप करणे थांबवत नाही तोपर्यत काही गोष्टी बदलणार नाही. जो गरम है फिझा वो कमी होनी चाहिए, हम तो बंबईया लोग है, हमने देखा वहा कैसे हमला हुआ था, ती लोकं काही नॉर्वेमधून तर आली नव्हती की इजिप्तमधून त्यांना कुणी पाठवले नव्हते.
ज्या लोकांनी मुंबईवर हल्ला केला होता ते अजुनही तुमच्या शहरांमध्ये फिरत आहेत. आणि हीच खंत जर भारतीयांच्या मनात असेल तर त्याचे तुम्हाला वाईट वाटता कामा नये. अशी भूमिका जावेद अख्तर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.