जावेद अख्तर यांनी केले देवांबद्दल ट्विट अन्‌ उमटल्या अश्‍या प्रतिक्रिया...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

बॉलिवूडचे काही स्टार नेहमीच चर्चेत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहायला त्यांना आवडते. अशेच एक आहेत सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर. अख्तर हे नेहमीच स्पष्टवक्तोपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नेहमीच त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तरीही जावेद अख्तर नेहमीच निर्भिडपणे मते मांडायला मागेपुढे पाहत नाही. 

देवावर विश्‍वास ठेवणारे आणि अविश्‍वास दाखवणारे जगात भरपूर आहेत. देवाने आम्हाला काय दिले? असा प्रश्‍न करून चक्‍क अविस्कार केला जातो. देव नुसात दगड आहे, त्याची काय पूजा करायची असा प्रश्‍न करून अनेक जण दुसऱ्यांच्या श्रद्धेवर प्रश्‍न उपस्थित करतात. यामुळे देवाच्या बाजूला असणारे आणि विरोध करणारे यांच्यात नेहमीच संघर्ष होत असतो. काही नुसतेच विरोध करीत फिरत असतात. तर काहींच्या विराधामागे वेगळेच कारण असते. चला तर जाणून घेऊन अशाच एका स्टारच्या विरोधाबाबत... 

बॉलिवूड... याच्याबद्दल कुणालाही काहीही सांगायची गरज नाही. जगात सर्वाधिक चित्रपट निर्मित बॉलिवूडद्वारे केली जाते. येथील अभिनेता आणि अभिनेत्रींना देवाजाच दर्जा दिला जातो. जो अभिनेता प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतो त्याच्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. आपल्या जिवाची बाजी लावण्यासही ते मागेपुढे पाहत नाही. 

बॉलिवूडचे काही स्टार नेहमीच चर्चेत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहायला त्यांना आवडते. अशेच एक आहेत सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर. अख्तर हे नेहमीच स्पष्टवक्तोपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नेहमीच त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तरीही जावेद अख्तर नेहमीच निर्भिडपणे मते मांडायला मागेपुढे पाहत नाही. 

काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी लाउडस्पिकरवर अजान लावण्यावर आक्षेप घेतला होता. लाउडस्पिकरवर अजान लावल्यामुळे अन्य लोकांना त्रास होतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांना टोल केले होतें. आता जावेद अख्तर यांनी नवीन ट्‌विट करून "मी सगळ्याच श्रद्धांविरोधात असलेला नास्तिक आहे' असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्‌विट पाहून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

मी लाऊडस्पिकरवर अजान लावण्याचा विरोध केल्यानंतर अनेकांनी टीका केली होती. त्यावेळेस मला नरकातही खूप हाल सोसावे लागतील, असे म्हटले होते. दुसरीकडे काही हिंदूत्ववादी लोकांनी मला देशद्रोही असेही म्हटले होते. यावेळी जावेद अख्तर यांच्या ट्‌विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशावेळी काहींनी त्यांना टोल केले आहे. तर काही या विषयावर त्यांच्याबरोबर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Javed Akhtar in discussion again on Twitter