Javed Akhtar : जावेद अख्तर यांना कोर्टाचा अखेर दिलासा... काय होतं प्रकरण?

आरएएसची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते.
Javed Akhtar
Javed Akhtaresakal

Javed Akhatar Mulund court relief RSS Comparison : आरएएसची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. आता कोर्टानं जावेद अख्तर यांना दिलासा दिल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अख्तर यांच्या या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. अखेर त्यावर कोर्टानं त्यांना दिलासा दिला आहे.

मुलुंड पोलिसांनी गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. एका वकिलाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. हे विधान आक्षेपार्ह असल्याचा दावा या वकिलाने तक्रारीत केला असून पोलिसांनी आता त्याबद्दल अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Also Read- रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

काय म्हणाले होते जावेद अख्तर? गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान विषयी आपले मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील त्यांनी टीका केली होती. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. हे बोलताना पुढे ते असेही म्हणाले होते की, आरएसएस(RSS), विश्व हिंदू परिषद(VHP) आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या जावेद अख्तर यांनी देशातील एक मुस्लिम समुह देखील तालिबानचे समर्थन करतोय, असं विधान एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

Javed Akhtar
Javed Akhtar : ... तेव्हा भारतातील मुस्लिम का बोलले नाहीत, कुठे गेले होते? जावेद अख्तर संतापले!

पुढे ते म्हणाले होते की, तालिबान आणि तालिबानसारखे बनण्याची ईच्छा ठेवणारे सारखेच आहेत. देशातील काही मुस्लिम समाजातील एक गट तालिबानचे स्वागत करतोय, असं म्हणत तालिबानचं समर्थन करणाऱ्या लोकांवर त्यांनी टीका केली होती. जगभरातील उजव्या विचारसरणीचे लोक सारखेच आहेत.

Javed Akhtar
Pathan Movie Review : शाहरुख, दीपिका अन् जॉनचा पठाण म्हणजे देशभक्तीचा केविलवाणा प्रयत्न

भारतात जमावाकडून होणाऱ्य़ा मारहाणीच्या घटनांबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, या घटना म्हणजे तालिबान बनण्याची फुल ड्रेस रिहर्सल आहे. हे लोक तालिबानच्या कृत्यांना स्विकारता आहे. हे सर्व एकच आहेत, फक्त नावाचा फरक आहे. पुढे बोलताना ते म्हणाले होते की, आरएसअस, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांचे जे लोक समर्थन करतात, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

Javed Akhtar
Mouni Roy : मौनीला पाहिल्यावर पडतो सगळ्याचा विसर!

नक्कीच तालिबान हे मध्ययुगीन मानसिकतेचे समर्थन करणारं संघटन आहे, मात्र आपण ज्या लोकांना समर्थन करताय ते त्यापेक्षा वेगळे आहेत का? या लोकांची मानसिता तालिबान सारखीच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com