Jawan Girija Oak: "मला त्या गोष्टीची चीड येते"; जवानमध्ये शाहरुख सोबत काम केलेल्या गिरीजा ओकचा खुलासा

शाहरुख खानच्या जवान मध्ये काम करणारी गिरीजा ओक का भडकली?
jawan actress girija oak godbole angry on beauty products shah rukh khan
jawan actress girija oak godbole angry on beauty products shah rukh khan SAKAL

Jawan Girija Oak: जवान सिनेमा आज ७ सप्टेंबरला सगळीकडे रिलीज झालाय. जवान पाहण्यासाठी शाहरुखचे तमाम फॅन्स थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

जवान सिनेमात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सुद्धा झळकत आहे. जवानचा पहिला टीझर जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हापासुनच सिनेमाची गाणी असो वा ट्रेलर.. गिरीजाची झलक दिसतेच आहे. पण नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजाने तिला कोणत्या गोष्टीची चीड येते याचा खुलासा केलाय.

(jawan actress girija oak godbole angry on beauty products)

jawan actress girija oak godbole angry on beauty products shah rukh khan
Jawan Twitter Review: एकच शब्द; "ब्लॉकबस्टर"! तो आला अन् त्यानं जिंकलं, शाहरुखचा जवानवर प्रेक्षक फिदा

गिरीजाला या गोष्टीची प्रचंड चीड

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक शाहरुखच्या बिग बजेट जवानमध्ये झळकत आहे. गिरीजा ओकची सध्या खुप चर्चा आहे. अशातच सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या चॅनलला गिरीजाने मुलाखत दिलीय. त्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, "मी कटाक्षाने फेअरनेस क्रीम्सच्या जाहीराती केल्या नाहीत. मला त्या गोष्टीची प्रचंड चीड येते."

गिरीजाने आजवर अनेक गोष्टींविषयी जाहिराती केल्या आहेत. मोठमोठ्या ब्रॅंड्समध्ये गिरीजाने काम केलंय. तेल, कॉर्नफ्लेक्स, गुड नाईट कॉईल अशा अनेक जाहिरातींमध्ये गिरीजाने काम केलंय. पण फेयरनेस क्रीम्सची जाहिरात करण्यास मात्र गिरीजाने नकार दिलाय.

शाहरुखसोबत नाचली मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले

शाहरुखचं जिंदा - बंदा गाणं काही दिवसांपुर्वी रिलीज झालं. या गाण्यात शाहरुख विविध गेटअपमध्ये दिसतोय. शाहरुखची डान्स स्टेप, त्याचा डान्स अशा अनेक गोष्टींची चर्चा झालीय. अशातच जिंदा - बंदा गाण्यात मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले शाहरुखच्या मागे नाचताना दिसतेय.

सर्वांना माहितच आहे की, गिरीजा ओक शाहरुखच्या जवान मध्ये झळकत आहे. जवानच्या प्रीव्ह्यु टीझरमध्ये गिरीजा झळकली होती. आता जवानच्या पहिल्या गाण्यात गिरीजा शाहरुखच्या मागे बिनधास्त नाचलीय.

शाहरुखच्या जवानवर उधळल्या पताका

शाहरुख खानचा जवान संपूर्ण भारतात आज रिलीज झालाय. जवानची किती क्रेझ आहे हे पाहायला मिळतंय.

शाहरुखच्या जवानचं जिंदा बंदा गाणं मोठ्या पडद्यावर आल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. थिएटरला पूर्ण स्टेडियमचं रुप आलेलं दिसलं. याशिवाय उपस्थित प्रेक्षकांनी पताकांची उधळण केली. याशिवाय मोबाईल टॉर्च लावून डान्स केला. एकुणच जवानमुळे संपूर्ण थिएटरमध्ये सण असल्यासारखं पब्लिक जल्लोष करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com