Jawan Prevue Twitter Reaction: 'बॉक्स ऑफिसवर जाळ अन् धूर संगच'! नेटकऱ्यांनी शाहरुखला डोक्यावरच उचललं!

Jawan Prevue Twitter Reaction
Jawan Prevue Twitter ReactionEsakal

Jawan Prevue Twitter Reaction: बॉलिवूडचा किंग खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत होता. त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवत निर्मात्यांनी शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रिव्ह्यू सोमवारी रिलीज झाला आहे.

शाहरुख खानच्या 'जवान' प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने झाली आहे.

या व्हिडिओत शाहरुख म्हणतोय की, ''मैं कौन हूं कौन नहीं, पता नहीं, ना तो कोई इरादा हूं. पुण्य हूं या पाप हूं ये खुद से पूछना क्योंकि मैं भी आप हूं. रेडी. नाम तो सुना होगा."

या व्हिडिओत विजय सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पदुकोण यांची झलक देखील दिसत आहे. ते ही दमदार अॅक्शन सीन करताना दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका ही कॅमिओ करणार असल्याचं बोलल जात आहे. काही मिनिटाच्या या 'जवान' प्रिव्ह्यू शाहरुख खान हा त्याचा लुक चेंज करतांना दिसला आहे. तो अनेक वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

Jawan Prevue Twitter Reaction
Bwaal Trailer OUT: वरुण - जान्हवीच्या लव्हस्टोरीत हिटलरची एंट्री! मनाला आवडणारा पण डोक्यावरुन जाणारा 'बवाल'

आता 'जवान' प्रिव्ह्यू आला म्हटल्यावर नेटकरींनीही यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. पठाण वेळी जो वाद झाला तो टाळण्याचा प्रयत्न शाहरुखने यावेळी केला आहे. त्यामुळे ट्विटरवर शाहरुखच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jawan Prevue Twitter Reaction
Jawan Prevue Trailer: मैं कौन हूं कौन नही! शाहरुख खानचा राडा..अखेर जवानचा ट्रेलर रिलिज..

#JawanPrevue #Sharukh khan #DeepikaPadukone #Blockbuster असे अनेक हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

अनेकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर सांगितलं आहे.

एकानं लिहिलयं की, "पहिल्या दिवसापासून ओरडत आहे की जवान पठाणपेक्षा भारी असेल पण यावेळी अॅटली #ShahRukhKhan सोबत भारतीय सिनेमात ब्लास्ट करेल. जब में खलनायक बनता हू ना...Mas नाही बॉक्स ऑफिस खल्लास"

Jawan Prevue Twitter Reaction
Jawan Preveu : 'जब मैं व्हिलन बनता हू, तब मेरे सामने कोई भी हिरो...' किंग खानचा पुन्हा धमाका

तर दुसऱ्याने लिहिलयं , JawanPrevue हा मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट टीझर आहे. कोणत्याच शब्द त्याचे वर्णन करू शकत नाही! स्टंट, डायलॉग, बीजीएम, अरे देवा srk voice + bgm ..बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार आहे.

त्यात ऐकाने लिहिले आहे, "हा तोच वॉक आहे, जो बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडून काढेल. कारण किंग शाह रुख खान इथे आहे'

शाहरुख खान आणि निर्मात्यांनी जवानच्या ट्रेलरसाठी काहीतरी खास प्लान केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रथम थिएटरमध्ये आणि नंतर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केला जाईल.

जवानचा ट्रेलर हॉलिवूड चित्रपट मिशन इम्पॉसिबल 7 (मिशन: इम्पॉसिबल- डेड रॉकिंग पार्ट वन) सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मिशन इम्पॉसिबल 7 हा चित्रपट 12 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com