Boycott Jawan : 'दरवेळी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तू आमच्या मंदिरात का जातोस?' शाहरुख का होतोय ट्रोल?

काही नेटकऱ्यांनी शाहरुखला एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
 Jawan Shah Rukh Khan Bollywood Actor trolled boycott movie
Jawan Shah Rukh Khan Bollywood Actor trolled boycott movieesakal
Updated on

Jawan Shah Rukh Khan Bollywood Actor trolled boycott movie : किंग खान शाहरुखचा जवान हा सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. जिकडे तिकडे जवानचीच चर्चा होताना दिसत आहे. पठाणनंतर शाहरुखचा हा बिग बजेट चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. त्याला प्रदर्शनापूर्वीच मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.

काही नेटकऱ्यांनी शाहरुखला एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये एका वेगळ्या ट्रेंडला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रमोशनचा भाग म्हणून वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता शाहरुखचे मंदिरात जाणे हे अनेकांना खटकताना दिसत आहे. तो नुकताच तिरुपती बालाजी मंदिरात गेला होता.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

त्याचं झालं असं की, किंग खान शाहरुख, मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री नयनतारा हे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. अशावेळी काही नेटकऱ्यांनी शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तू आमच्या मंदिरात जातोस कसा, असा प्रश्नही शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारला आहे. यावेळी हॅशटॅग #BoycottJawanMovie ट्रेंड होताना दिसत आहे.

आमची मंदिरं ही तुझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाही.याची काळजी शाहरुख तू घ्यायला हवी. असेही नेटकऱ्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यापूर्वी शाहरुखच्या पठाण नावाच्या चित्रपटावरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतर आता जवानवरुनही काही नेटकऱ्यांनी वेगळ्याच गोष्टीवरुन किंग खानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. यासगळ्यात शाहरुखनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरवेळी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख तू मंदिरांमध्ये का जातोस, हा सगळा काय प्रकार आहे, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, ही व्यक्ती नेहमीच असं सांगत असते की, मीच किती खरा आहे आणि बाकीचे खोटे आहेत...#BoycottJawanMovie हा ट्रेंड सध्या वेगानं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिसऱ्यानं या साऱ्याचा संबंध बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतशी जोडला आहे.

 Jawan Shah Rukh Khan Bollywood Actor trolled boycott movie
Jawan Fever: महाराष्ट्रात या ठिकाणी मध्यरात्री २ वाजता प्रेक्षकांची रांग, जवान पाहण्यासाठी शाहरुखच्या फॅन्सची गर्दी

जवानच्या अॅडव्हान्स बूकींगविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटानं आतापर्यत दहा लाख तिकिटांची अॅडव्हान्स बूकींग केली आहे. यावरुन जवानला मिळणारा प्रतिसाद किती प्रचंड आहे हे दिसून येईल. जवाननं अॅडव्हान्स बूकींगमधून २७ कोटींची कमाई केली आहे. हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, जवान हा पहिल्याच दिवशी शंभर कोटींची कमाई करण्यात यशस्वी होईल.

 Jawan Shah Rukh Khan Bollywood Actor trolled boycott movie
Jawan Release: रिलीजआधीच जवानचं मोठं आर्थिक नुकसान, या शहरात तीन दिवस थिएटर बंद असल्याने बसणार फटका

प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट गिरीश जोहर यांनी जवानबाबत भाकीत केले आहे. त्यात त्यांनी शाहरुखचा जवान ऐतिहासिक कामगिरी करण्यास तयार झाला आहे. अशी मोठी कामगिरी करणारा त्याचा तो पहिलाच चित्रपट असणार आहे यात कोणतीही शंका नाही. शाहरुखचा जवान हा विदेशातून ४० कोटी तर भारतातून ६० कोटी रुपये पहिल्याच दिवशी कमविण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com