Mahi Vij Daughter: जय-माहीची लेक रुग्णालयात दाखल! ताराला झाली गंभीर आजाराची लागण..

Mahi Vij Daughter:
Mahi Vij Daughter:Esakal

Tara Influenza B Virus: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार जय भानुशाली आणि माही विज हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक आहेत. माही सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. 'बालिका वधू', 'लाल इश्क', 'शुभ कदम' आणि 'कैसी लागी लगन' या लोकप्रिय मालिकेत काम करुन ती घरघरात पोहचली आहे.

माही आणि जयची लेक तारा देखील तितकिच लोकप्रिय आहे. अवघ्या 4वर्षाच्या ताराच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. मात्र माहीची लेक ताराच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. माहीच्या लेकीला रुग्णालयात दाखल आहे. ताराला इन्फ्लूएंझा ए फ्लूची लागण झाली आहे.

माही आणि जयची मुलगी तारा ही 4 वर्षांची आहे. पण ती तिच्या क्यूटनेस आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सर्वांची लाडकी बनली आहे. ती रील्सही बनवते. नेटकरी तिच्यावर खुप प्रेमही करतात. मात्र आता तिची तब्येत बिघडली आहे.

माहीने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलीचे केस बांधून तिच्यासोबत खेळत आहे. यावेळी ती तिच्या लेकीच्या आजाराबद्दलही सांगत आहे. यात तिने सांगितले की, मुलीला खूप ताप भरला आणि नंतर फ्लू झाला. याव्हिडिओत तिने पालकांना त्यांच्या लहान मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे.

Mahi Vij Daughter:
VIDEO: 'भांडे घासून ये'म्हणणाऱ्या युझरला पाकच्या मुलीने दिले सडेतोड उत्तर.. होतंय कौतुक

याबाबत माहीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिलं की, जेव्हा तिच्या लेकीला ताप आला तेव्हा सुरुवातीला तिला तो इतका गंभीर वाटला नाही मात्र नंतर माही आणि तिची फॅमिली खुपच घाबरली.

जेव्हा रात्री ताराला ताप भरला तेव्हा त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून तिला औषधे देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा परिणाम तारावर झाला नाही. तिला ताप 104 पेक्षा जास्त ताप होता. माहीने तिला रात्री थंड पाण्याच्या पट्ट्याही लावायल्या. त्या रात्री भीतीमुळे माही रात्रभर झोपु शकली नाही.

Mahi Vij Daughter:
Border 2 : 'बॉर्डर २ येणार का?' सनीनं दिली मोठी प्रतिक्रिया! 'मला अजूनही...'

याच पोस्टमध्ये माहीने पुढे लिहिले की, 'शुक्रवारी सकाळी ताराला घेवुन ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या आणि तिला इन्फ्लूएंझा ए फ्लूची लागण झाल्याचे त्यांना आढळून आलं.

या आजाराबाबत सांगताना माही म्हणते, हा श्वसनाशी संबधित सर्वात विषाणूजन्य संसर्ग आहे. त्यात खूप ताप, अंगदुखी, खोकला आणि इतर लक्षणे असतात. बहुतेक मुले एका आठवड्यात फ्लूपासून बरे होतात, परंतु काही मुले अधिक गंभीर होतात आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ताराला त्यांनी रुग्णालयात दाखल केले.

Mahi Vij Daughter:
Sunny Deol's Juhu Bungalow: सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती, हे आहे कारण

ताराच्या प्रकृतीबाबत सांगताना माहीने लिहिले की, आता तारा दिवसेंदिवस बरी होत आहे. आज चौथा दिवस असून ती घरी जाण्याचा हट्ट करतेय. लवकरच तिला डिस्चार्ज मिळेल.

माहीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी तिला धीर देत आहे तर अनेकांनी तारा लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com