esakal | VIDEO : मायलेकीचा अफलातून डान्स; 'पल्लो लटके' गाण्यावर थिरकल्या श्वेता व जया बच्चन
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : मायलेकीचा अफलातून डान्स; 'पल्लो लटके' गाण्यावर थिरकल्या श्वेता व जया बच्चन

जया बच्चन यांचा असाच एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

VIDEO : मायलेकीचा अफलातून डान्स; 'पल्लो लटके' गाण्यावर थिरकल्या श्वेता व जया बच्चन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मुंबई: अभिनेत्री जया बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटविश्वात नाव कमावल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र त्यांचे जुने फोटो व व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतात. जया बच्चन यांचा असाच एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये त्या मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहेत. 'पल्लो लटके' या गाण्यावर जया आणि श्वेता बच्चन मिळून डान्स करत आहेत. या व्हिडीओला साठ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

कोरिओग्राफर राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. डान्स फ्लोअरवर श्वेता आणि जया बच्चन यांच्यासोबत मास्टरजी राजेंद्रसुद्धा आहेत आणि तेच जया बच्चन यांना डान्स करण्यास सांगताना दिसत आहेत. त्यांच्या आग्रहास्तव श्वेतासोबत जया बच्चनसुद्धा थिरकतात. मायलेकीचा हा डान्स पाहून उपस्थितांनीही टाळ्यांचा वर्षाव केला. जया बच्चन आणि श्वेता यांना अशाप्रकारे एकत्र डान्स करताना पाहिलं गेलं नव्हतं. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

राजेंद्र सिंह हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर असून त्यांनी याआधी सारा अली खान, नीतू कपूर यांच्यासोबतचाही डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

jaya bachchan dance with daughter shweta bachchan on pallo latke

loading image