Jaya Bachchan: 'मीडियाला पाहिल्यावर का येतो राग?', अखेर जया बच्चन यांनी सांगितलं कारण

जया बच्चन यांचे नेहमीच मीडियावर रागावल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात,ज्यामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं.
Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Jaya Bachchan Finally reveal why she get angry on mediaGoogle
Updated on

Jaya Bachchan: जया बच्चन नेहमीच मीडियासोबत उद्धट बोलण्यामुळे ट्रोल होताना दिसतात. त्या अनेकदा मीडियाच्या फोटोग्राफर्सवर रागावताना दिसतात,मग अगदी त्यांच्यासोबत कुटंबातलं इतर कुणीही असो,त्या मागेपुढे पहात नाहीत. आता जया बच्चन यांनी आपण असं का वागतो याविषयी स्पष्टिकरण दिलं आहे.( Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media)

Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Money Laundring Case: दिवाळीचा मुहूर्त जॅकलिनसाठी ठरेल का लकी? अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

जया बच्चन यांनी आपली नात नव्या नंदा हिच्या नव्यानं सुरू केलेल्या पॉडकास्टमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. नव्या नंदानं तिचा 'व्हॉट द हेल' हा पॉडकास्ट शो सुरू केला आहे. जया बच्चन यांनी या शो मध्येच आपल्या मनातलं ओठांवर आणलं आहे. जया म्हणाल्या की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे दखल देतात त्यांचा त्यांना खूप राग येतो. त्यांनी मीडियाशी आपल्या उद्धट बोलण्याविषयी स्पष्टिकरण देताना म्हटलं आहे की,''मला ती लोकं आवडत नाहीत जे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तगत करतात आणि खोटं बोलून आपलं पोट भरतात. मी नेहमीच पत्रकारांवर ओरडायचे की तुम्हाला लाज नाही वाटत खोटं बोलताना...''

Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Marathi Movie: अखेर मराठीला मिळाला दमदार Action Hero, कोण आहे प्रसाद मंगेश ज्याची रंगलीय चर्चा...

यानंतर नव्यानं जेव्हा जया बच्चन यांना विचारलं की अभिनेत्री बनताना हे माहित नव्हतं का की या सगळ्या गोष्टी घडणारच आपल्यासोबत. तेव्हा जया म्हणाल्या,''नाही मला तेव्हा इतकं काही होईल हे माहित नव्हतं. त्यामुळे मी कधीच मीडियानं बोललेल्या गोष्टींचे समर्थन केलं नाही''. त्या हे देखील म्हणाल्या की,खरं तर मी असं पटकनं बोलते याचं मला वाईटही वाटतं.

Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Mukesh Khanna:'शक्तिमान'चा दिग्दर्शक हिंदू नाही म्हणून मुकेश खन्ना नाराज? पोस्ट करत स्पष्टच म्हणाले...

जया पुढे म्हणाल्या,''असं नाही की हे फक्त आज घडत आहे,मी आधीपासूनच अशी आहे. तुम्ही माझ्या कामाविषयी बोललात तर मला काहीच अडचण नाही. तुम्ही भले म्हणा की मी एक चांगली अभिनेत्री नाही. यांनी खूप फ्लॉप सिनेमे केलेयत. ही चांगली दिसत नाही. कारण हे दृकश्राव्य माध्यम आहे. पण याव्यतिरिक्त मर्यादा ओलांडत जर बोलाल तर मला फरक पडतो''.

Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Salman Khan: डेंग्यू झाल्यानंतर कसा आहे सलमान? कधी होणार कामावर रुजू? समोर आली अपडेट

ट्रोलर्सविषयी जया बच्चन म्हणाल्या,''जर लोक मी मीडियावर ओरडतानाच्या व्हिडीओला,स्टेटमेंटला सोशल मीडियावर पोस्ट करतील आणि पैसे कमावतील तर मला फरक पडणार ना. तुम्ही माझ्या सिनेमांविषयी,राजकीय कारकिर्दीविषयी कमेंट करा पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तुम्ही प्रश्न नाही करू शकत. लोक म्हणतात, मी नेहमी रागात असते. राग कोणत्या गोष्टीचा? तुम्ही मला फोटो काढण्याच्या निमित्तानं थांबवता आणि वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारून भंडावून सोडता. मी म्हणतेय नको,तरी माझे फोटो क्लिक करता, मी माणूस नाहीय का? मला नकार देण्याचा अधिकार नाही...''

Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Adinath Kothare:'मुंबई-पुण्याचा जुना घाट म्हणजे...',एक्सप्रेस-वे संदर्भातील पोस्टमुळे आदिनाथ चर्चेत

सेलिब्रिटींचे व्हिडीओ एडिट करून कसे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश केले जातात याविषयी देखील जया म्हणाल्या. ''हे स्वातंत्र्य यांना कोणी दिलं? लोक कमेंट करतात कारण त्यांना माहितीय यावर रिअॅक्शन येणार,चर्चा होणार आणि मग तू-तू-मै-मै सुरू होणार''.

Jaya Bachchan Finally reveal why she get angry on media
Urmila Kothare: 'मनात लपवून ठेवलेली लव्ह स्टोरी...', हे काय म्हणाली उर्मिला?

माहितीसाठी इथं नमूद करतो की जया आणि नव्या यांना काही दिवसांपूर्वी एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. त्या दरम्यान जेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटोज क्लिक केले तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,''मला मनापासून वाटतं तुम्ही चांगलं पडायला हवं फोटो काढता-काढता. तुम्ही आहात कोण? कोणत्या मीडियातून आहात तुम्ही?''

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि यावरनं त्यांना खूप ट्रोलही केलं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com