'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, जान्हवी कपूर हिला इतर मुख्य भूमिकांतील कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळाले आहे.

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा अधिकृत रिमेक आहे. या सिनेमासाठी जान्हवीला ईशान पेक्षा कमी मानधन दिले गेले आहे. 

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, जान्हवी कपूर हिला इतर मुख्य भूमिकांतील कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळाले आहे. जान्हवीला 40 ते 45 लाख रुपये तर ईशानला 60 ते 70 लाख रुपये मानधन मिळाले आहे. या सिनेमात आशुतोष राणाही मुख्य भुमिकेत आहे. त्यांना 50 लाख रुपये फी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

सिनेमाचं बजेट 25 ते 30 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. ईशान खट्टरचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी तो 'बियॉन्ड द क्लाउड्स' सिनेमात दिसला होता. सिनेमाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांना 4 कोटी रुपये मिळाले आहेत. तर संगीतरकार अजय-अतुलला दीड कोटी मिळाल्याचं वृत्त आहे. 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना रिमेक राईट्ससाठी 2 कोटी रुपये दिल्याचं वृत्त बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलं आहे. 'धडक' हा सिनेमा 20 जुलै ला प्रदर्शित होणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jhanvi kapoor and ishaan khattar upcoming movie Dhadak