जॉनच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे काम सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जॉनने काही दिवसांपूर्वीच तो एक मराठी चित्रपट करणार आहे, याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती आणि बघता बघता त्याचे हे स्वप्न आकारास आले. प्रसिद्ध मराठी नाटक "सविता दामोदर परांजपे' यावर आधारित त्याच नावाचा मराठी चित्रपट जॉन त्याच्या जे. ए. एन्टरटेंन्मेंट या बॅनरखाली या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच चालू झाले आहे. या नाटकाची कथा त्याला इतकी आवडली होती की त्यावर त्याने लगेच चित्रपट करायचे, असे ठरवूनच टाकले होते. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल व रूपेश बापट काम करत आहेत. स्वप्ना वाघमारे-जोशी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम करत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: John Abraham begins the shoot of his maiden Marathi project Savita Damodar Paranjpe