esakal | जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत धमाल डान्स; नेटकरी पडले प्रेमात
sakal

बोलून बातमी शोधा

johnny lever

त्यांच्या चेहऱ्यावरील फक्त हावभाव जरी पाहिले तरी चेहऱ्यावर हास्य झळकल्याशिवाय राहत नाही.

जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत धमाल डान्स; नेटकरी पडले प्रेमात

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या अभिनयाने आणि अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर. त्यांच्या चेहऱ्यावरील फक्त हावभाव जरी पाहिले तरी चेहऱ्यावर हास्य झळकल्याशिवाय राहत नाही. वयाच्या ६३ व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि त्यांची ऊर्जा ही तरुणांनाही लाजवणारी आहे. याचीच प्रचिती त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओतून येते. सध्या सोशल मीडियावर 'डोंट रश' या गाण्यावर डान्स करण्याचा ट्रेंड आहे. मात्र जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या मुलांसोबत अफलातून डान्स करत 'डोंट टच' हा ट्रेंड समोर आणला आहे. जॉनी लिव्हर यांनी स्वत: त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत मुलगा जेमी लिव्हर आणि मुलगी जेसी लिव्हर नाचताना दिसत आहेत.

जॉनी लिव्हर यांच्यासारखीच त्यांची मुलं डान्स आणि कॉमेडीमध्ये तरबेज आहेत. जॉनी लिव्हर आणि त्यांच्या मुलीची कॉमेडी प्रेक्षकांनी अनेकदा पाहिली आहे. मात्र या तिघांना एकत्र असं नाचताना पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. या तिघांचा डान्स आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीसुद्धा त्यांच्या प्रेमात पडले आहेत. 

हेही वाचा : 'कल हो ना हो'मधील जिया आठवतेय? इंडस्ट्रीपासून दूर आता करतेय हे काम

जॉनी लिव्हर यांनी या व्हिडीओमार्फत कोरोनासंदर्भातही संदेश दिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'लस घेण्यापर्यंत डोंट टच मी... माझी मुलं जेमी आणि जेसी लिव्हरसोबत.' जेमीने याआधीही वडिलांसोबत कॉमेडी व्हिडीओ पोस्ट केले होते. जेमीने २०१२ मध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली. तिने 'किस किस को प्यार करूं' आणि 'हाऊसफुल ४' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय. 
 

loading image