
Abdu Rozik :पॉर्न स्टार जॉनी सिन्स पण झाला अब्दू रोजिकचा चाहता
बिग बॉस 16 या शो'मधील सर्वांत आवडता स्पर्धक कोण असं जर विचारलं तर, अनेकांच्या तोंडी अब्दू रोजिक हेच नाव येतं. ताजिकिस्तानचा अब्दूने बिग बॉसच्या घरात येऊन आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याच्या गोंडसपणा, निरागसपणा आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे त्याला वादग्रस्त घरात 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहण्यास मदत झाली. काहीच दिवसांपुर्वी बिग बॉसच्या घरातून अब्दूचा प्रवास संपला . प्रसिद्ध पॉर्न स्टार जॉनी सिन्स देखील अब्दूचा चाहता झाला आहे.
हेही वाचा: Bigg Boss 16: प्रियंका चौधरी कौटुंबिक स्थितीबद्दल बोलते खोटं? अभिनेत्रीच्या भावाने दिले स्पष्टीकरण
अब्दू रोजिक स्वेच्छेने घरा बाहेर पडल्यानंतर एका दिवसानंतर अब्दूने त्याचे प्यार हे गाणे लाँच केले. अब्दूने त्याचा पहिला कॉन्सर्ट केला आणि गाणे मुंबईत लाँच केले. आत्तापर्यंत, त्याच्या गाण्याला 783K व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यांच्या गाण्याचे कौतुक केले पण सगळ्यात आश्चर्य होते म्हणजे 11,000 कमेंट्सपैकी एक कमेंट होती ती म्हणजे पॉर्न स्टार जॉनी सिन्सची. पॉर्न स्टार जॉनी सिन्सने देखील अब्दूचा गाण्यावर कमेंट्स केलीय.
पॉर्न स्टार जॉनी सिन्सने गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, "ज्याला अब्दु रोजिक आवडतात ते हात वर करा." अपेक्षेप्रमाणे, जॉनीला देखील त्याच्या कमेंट्सला 500 हून अधिक प्रतिसाद मिळाले. अब्दूच्या काही चाहत्यांनी त्याला सांगितले की प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो आणि त्यांना त्यांचे कौतुक सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. आम्हा सर्वांना अब्दु आवडतो" दुसर्या नेटिझनने लिहिले, "आम्हाला अब्दू रोजिक इतके आवडते की आम्हाला हात वर करण्याची गरज नाही कारण सर्वांना माहित आहे की अब्दूवर सर्वांच प्रेम आहे कोणीही त्याचा द्वेष करत नाही."
हेही वाचा: Prajakta Mali: एक नाही तर तब्बल सतरा वेळा शाहरुखला धडकली प्राजक्ता, या सिनेमात केलंय काम
अब्दू बिग बॉसच्या घरात सहभागी होता. अब्दूची शिव ठाकरे, MC स्टॅन , साजिद खान यांच्यासोबत खास मैत्री झाली. अब्दू जेव्हा घराबाहेर गेला तेव्हा सर्वजण रडले होते आणि इमोशनल झाले होते