सोनू निगमच्या इंडस्ट्रीमधील 'म्युझिक माफिया' आरोपावर जुबिन नौतीयाल असहमत

sonu jubin
sonu jubin
Updated on

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा घराणेशाही आणि मक्तेदारीचा वाद समोर आला आहे. याचदरम्याने प्रसिद्ध गायक सोनू निगमने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करुन धक्कादायक खुलासा केला होता. या व्हिडिओमधून त्याने सिनेइंडस्ट्रीमधील म्युझिक माफियांवर नवीन गायकांना संधी देत नसल्याचा आरोप केला होता.मात्र सोनूने केलेल्या या आरोपावर प्रसिद्ध गायक जुबिन नौतियाल सहमत नाहीये. काय म्हणाला जुबिन वाचा..

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार जुबिनने म्हटलंय की, अनेकदा इंडस्ट्रीमध्ये तुमचे काही आवडते लोक असतात मात्र जेव्हा कोणता गायक किंवा संगीतकार एक उत्तम गाणं तयार करतो तेव्हा तुम्ही त्याचा स्विकार केला पाहिजे. तुम्ही ते नाकारु शकत नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये घराणेशाही या मुद्द्याने म्युझिक इंडस्ट्रीलाही प्रभावित केलंही असेल मात्र आजच्या काळात चांगला कॉन्टेन्ट, हुशार कलाकार आणि चांगल्या आवाजाची कदर केली जाते. आणि हेच  सगळ्या म्युझिक कंपन्या, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना हवं असतं. 

प्रसिद्ध गायक सोनू निगमने काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं होतं की सिनेइंडस्ट्रीमधील म्युझिक माफिया नवीन आणि हुशार गायकांच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात. सोनूने पुढे असं म्हटलं होतं की अनेक बड्या संगीत दिग्दर्शक आणि गायकांकडून त्यांच्या हातातलं काम काढून घेण्यात आलं होतं. कारण काही बडे अभिनेत्यांनी त्यांना काम देणं थांबवलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

सोनूच्या म्हणण्यानुसार हे म्युझिक माफिया सिनेमांपेक्षाही मोठे आहेत. तेव्हा त्याने इंडस्ट्रीला असा इशारा देत सूचित केलं होतं की जर हे सगळं या क्षणाला थांबवलं गेलं नाही तर लवकरंच म्युझिक इंडस्ट्रीमध्येही आत्महत्येची अनेक प्रकरंणं व्हायला वेळ लागणार नाही.    

jubin nautiyal is disagree with sonu nigam music mafia comment  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com