सरस्वती.. नाॅटआऊट 500 एपिसोडस!

टीम ई सकाळ
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नात्यातं प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलही संकट सहज पार पाडता येतं यावर सरस्वतीने विश्वास ठेवत अनेक अडचणीवर मात केली. या मालिकेला खास करून सरस्वती आणि राघवला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. प्रेक्षकांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आज कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सरस्वती मालिकेचे ५०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत.

मुंबई : नात्यातं प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलही संकट सहज पार पाडता येतं यावर सरस्वतीने विश्वास ठेवत अनेक अडचणीवर मात केली. या मालिकेला खास करून सरस्वती आणि राघवला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. प्रेक्षकांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आज कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सरस्वती मालिकेचे ५०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत.

मालिकेच्या टीमने एकत्र मिळून पार्टी केली ज्यामध्ये मालिकेशी जोडलेला प्रत्येक कलाकार पार्टीमध्ये हजर होता. मालिकेमध्ये आता देविका म्हणजेच जुई गडकरी’ची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने सरस्वती आणि राघवच्या आयुष्यात काय बदल होणार आहे ? सरस्वती मालिकाला कुठलं नवीन वळण मिळणार आहे हे बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक असणार आहे.
 
सरस्वती – राघवच्या या २ वर्षांच्या प्रवासामाध्ये खूप घटना घडल्या ज्यामध्ये सरस्वती खंबीरपणे उभी राहली. या प्रवासात प्रेक्षक सरस्वती सामोरी गेलेल्या अनेक अडचणीना, आव्हानांना, तसेच सरस्वती – राघवच्या फुलणाऱ्या प्रीतीचे साक्षी ठरले. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली, ती म्हणजे, कोणत्याही संकटाच्या वेळी जीवाला जीव देणारी, आपुलकी जपणारी सरस्वती आणि तिचा नात्यांवर असलेला विश्वास. आपल्याच घरची, आपल्याच माणसांची वाटणारी, नात्यांमधली आपुलकी जपणारी आपली ही आवडती मालिका आता ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे आणि यानंतर ही कथा अधिकच उत्कंठावर्धक वळणावर पोचणार आहे... काय आहे हे नवं वळण, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा, सरस्वती – सोमवार ते शनिवार रात्री ७.०० वा. कलर्स मराठीवर !
 

Web Title: juee gadkari in saraswati esakal news