Juhi Chawala: 'मुंबईची हवा खराब, कसला वास सुटलाय'! जुहीचं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Juhi Chawala

Juhi Chawala: 'मुंबईची हवा खराब, कसला वास सुटलाय'! जुहीचं ट्विट

Juhi Chawala tweet viral: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हल्ली वेगवेगळ्या गोष्टींवर आपली सडेतोड प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे. आता जुहीनं राज्याची राजधानी मुंबईवर केलेलं ट्विट हे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झालं आहे. त्यामुळे अनेकांनी जुहीला धारेवर धरलं आहे. यापूर्वी देखील जुहीनं 5 जी वरुन केलेल्या ट्विटमुळे तिला न्यायालयानं फटकारलं होतं.

जुहीनं तिच्या ट्विटमधून मुंबईच्या पर्यावरणावर निशाणा साधलाय. ती म्हणते, तुमच्यापैकी कुणी नोटीस केलं आहे का, ते म्हणजे हल्ली मुंबईची हवा किती खराब झालीय. आपण जेव्हा खाड़ीवरुन प्रवास करतो तेव्हा तर नाकावर हात ठेवून प्रवास करावा लागतो. किती दुर्गंधी सुटलीये. प्रदुषित झालेलं पाणी वरळी आणि बांद्रयातून थेट मिठी नदीत जाते आहे. याचे आपल्याला काहीच वाटत नाही का, असा प्रश्न जुहीनं विचारला आहे.

हेही वाचा: Video Viral: लाईटवालं मांजर बघितलंय का? चला त्वरा करा

जुहीच्या त्या ट्विटवरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदुषणावर उलट सुलट चर्चा सुरु झाली. राजकीय पक्षांनी देखील फटाके वाजविण्यावरुन दिलेली प्रतिक्रिया भलत्याच दिशेला भरकटल्याचे दिसून आले होते. आता दक्षिण मुंबईतील प्रदुषण जीवघेणे झाले आहे. रासायनिक प्रदुषणानं हवा खराब झाल्याचे जुहीनं त्या व्टिटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: Janhavi Kapoor: गुलाबी थंडीत जान्हवीचा हॉट अंदाज करेल घायाळ