esakal | तोऱ्यात धावली होती कोर्टात, जुहीनं आता का घेतली माघार ?
sakal

बोलून बातमी शोधा

juhi chawala

तोऱ्यात धावली होती कोर्टात, जुहीनं आता का घेतली माघार ?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची (bollywood) प्रख्यात अभिनेत्री जुही चावलानं (juhi chawala) काही दिवसांपूर्वी ५ जी नेटवर्कच्या संदर्भात हायकोर्टात धाव घेतली होती. 5 जी मुळे माणसं आणि प्राण्यांच्या आरोग्याला धोका असल्याचं तिनं सांगितलं होत. त्यावर न्यायालयानं तिला आपलं म्हणणं अधिक विस्तृतपणे मांडण्यास सांगितलं होतं. मात्र दरम्यानच्या काळात जुहीनं त्या सुनावणीचा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल केला होता. त्याची चर्चा सगळ्यात जास्त होती. तेव्हा जुहीला न्यायालयानं फटकारलं होतं. आणि तिला दंडही ठोठावला होता. (juhi chawla withdraws plea against 5g from delhi high court yst88)

जुहीन जी याचिका दाखल केली होती, त्यात तिनं न्यायालयाला संबंधित कंपन्यांना संशोधन करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली होती. मात्र आता जुहीनं आपली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या जुहीनं मोठ्या उत्साहानं 5 जीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच जुहीनं आता माघार घेतली आहे त्याचे कारण काय, असा प्रश्न तिला चाहते विचारु लागले आहेत. सोशल मीडियावर न्यायालयीन कामकाजाच्या लिंक व्हायरल करणं तिला महागात पडलं होतं.

न्यायालयानं त्याप्रकरणावरुन 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. गुरुवारी न्यायमुर्ती जयंत नाथ यांनी जुहीच्या वकिलांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी जुही आणि आणखी दोघांनी 5 जीच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात 20 लाखांचा दंड भरावा असा उल्लेख त्या याचिकेत केला होता. त्यावर उच्च न्यायालयानं 4 जुनला त्या 5 जीच्या विरोधातील निर्णय दिला. त्यात न्यायालयानं ती याचिका रद्द ठरवली होती.

हेही वाचा: एक अनोखी प्रेमकथा 'मन झालं बाजिंद'

5 जी नेटवर्क सुविधा सुरु करण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होणार आहेत याची चौकशी करण्यात यावी. ही यंत्रणा भारतात कार्यान्वित होण्यापूर्वी टेक्नोलॉजीच्या फायद्या तोट्याचा विचार व्हावा. तसेच या सेवेबाबत आणखी खोलात जाऊन संशोधन होण्याची गरज आहे. असेही जुहीनं म्हटलं आहे.

loading image
go to top