
Jui Gadkari: 'पुढचं पाऊल' या स्टार प्रवाह वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदर्श सून म्हणजे 'कल्याणी' आता बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करत आहे. स्टार प्रवाह वरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(Jui Gadkari grand come back on star pravah tharal tar mag serial telecast on 5 December)
स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘ठरलं तर मग’. ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्र भेटीला येतील. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असेल. स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे.
ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील याची खात्री आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. अनाथ असली तरी नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं.’
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मिडियावर शेयर करण्यात आला असून त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. यामध्ये जुई म्हणजेच सायली एका अनाथअ आश्रमात मुलांची देखभाल करताना दाखवली आहे. त्यांच्या भुकेसाठी ती स्वतः उपाशी राहते, पण तिथे असणारे आजोबा मात्र तिला मायेने जेवू घालतात. 'एकमेकांना घासातला घास द्यायचा...' असे या मालिकेचे ब्रीद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.