esakal | 'निरोपही देता आला नाही'; अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचं कोरोनाने निधन
sakal

बोलून बातमी शोधा

TV Actress Sneha Wagh

'निरोपही देता आला नाही'; अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचं कोरोनाने निधन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'ज्योती' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर स्नेहाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. स्नेहाच्या वडिलांना न्युमोनिया झाला होता आणि त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली.

स्नेहा वाघची पोस्ट-

'तुमच्या शब्दांनी तुम्ही अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, त्यांच्यात सकारात्मकता आणली. तुमच्यात संयम खूप होता आणि तुमचं मन फार प्रेमळ होतं. आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम राहावं अशी तुम्ही आम्हाला शिकवण दिली. आमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं बळ आम्हाला दिलं. आम्ही जसे आहोत त्याहून अधिक चांगले होण्यास आम्हाला सांगितलं. तुम्ही नेहमीच आमचे पहिले हिरो असाल. पण हे खूपच दु:खदायक आहे की आम्हाला आता तुमच्याशिवाय राहावं लागणार आहे. तुम्हाला आम्ही नीट निरोपसुद्धा देऊ शकलो नाही. तुमच्यासाठी आम्ही फार काही करू शकलो नाही आणि आता आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं कधीच नसेल', अशा शब्दांत स्नेहाने भावना व्यक्त केल्या.

स्नेहाच्या या पोस्टवर कमेंट करत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या बाबांना श्रद्धांजली वाहिली. करण पटेल, मनीष नागदेव, स्मिता यांनी स्नेहाच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना व्यक्त केल्या. २७ एप्रिल रोजी स्नेहाच्या वडिलांचं निधन झालं. स्नेहाने 'ज्योती', 'चंद्रगुप्त मौर्य' आणि 'वीरा' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

loading image
go to top