कासव चले अपनी चाल.. शो वाढले; 11 वरून 75 वर!

शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सात सिनेमांमुळे थिएटरवर गर्दी झाली. कुणाला चांगल्या वेळा मिळाल्या तर कुणाला थिएटर्स.. पण झालेली ही गर्दी दुर्दैवी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. पण दिलासादायक बाब अशी की, ससा कासवाच्या शर्यतीप्रमाणे मराठी चित्रपटातल्या कासवानेही हळूहळू का होईना पण आपली अशी खमकी वाटचाल सुरू केली आहे. म्हणूनच अवघ्या 10 ते 12 शोने सुरू झालेली या चित्रपटाचे शो वाढत जाऊन आता ते 75 वर पोचले आहेत. 

पुणे ; गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सात सिनेमांमुळे थिएटरवर गर्दी झाली. कुणाला चांगल्या वेळा मिळाल्या तर कुणाला थिएटर्स.. पण झालेली ही गर्दी दुर्दैवी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. पण दिलासादायक बाब अशी की, ससा कासवाच्या शर्यतीप्रमाणे मराठी चित्रपटातल्या कासवानेही हळूहळू का होईना पण आपली अशी खमकी वाटचाल सुरू केली आहे. म्हणूनच अवघ्या 10 ते 12 शोने सुरू झालेले या चित्रपटाचे शो वाढत जाऊन आता ते 75 वर पोचले आहेत. 

कासवचा ट्रेलर पाहा..

राष्ट्रीय पुरस्कारात सुवर्णकमळ पटकावलेल्या कासवबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. कासवसोबत शर्यतीत सहा सिनेमा आल्याने ही शर्यत नेमकी कोण जिंकणार असा प्रश्न होता. मराठी रसिक माउथ पब्लिसीटीवर थिएटरमध्ये जातो ही बाब खरी असल्याामुळे हळूहळू नेमका कोणता सिनेमा तग धरणार याबद्दल शंका होती. मराठी प्रेक्षकांनी चांगल्या आशयघन चित्रपटावर नेहमीच प्रेम केलं आहे. त्याचा प्रत्यय आताही आला आहे. सुनील सुकथनकर-सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव या चित्रपटालाही मराठी रसिकांचा सावध का होईना पण चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. म्हणूनच सध्या कासवचे शो वाढले असून महाराष्ट्रात तो सध्या 51 ठिकाणी लागल्याची माहिती सुनील सुकथनकर यांनी दिली. इतकंच नव्हे, तर या 51 ठिकाणी आता सुमारे 75 शो लागले आहेत.

याबद्दल बोलताना सुनील सुकथनकर म्हणाले, 'या चित्रपटाला वाढता प्रतिसाद आहे. दादरचं सिटीलाईट, कोथरूडचं सिटीप्राईड, मंगला, अभिरूची या थिएटर्सवर रसिकांची गर्दी होते आहे. म्हणूनच पुण्यात अलका या थिएटरलाही शो लागला आहे. शिवाय औरंगाबादसह इतर शहरातील मल्टिप्लेक्समध्येही आमचे शो मागतायतं. ही दिलासादायक बाब आहे. गेल्या शुक्रवारी सात चित्रपट आले खरं. पण या शुक्रवारी सिनेमे नसल्याने आमाच चित्रपट थिएटरवर राहील. आता पुढच्या शुक्रवारी काय होईल हे आत्ता सांगता येणार नाही. मराठी रसिकांचा प्रतिसाद असाच चढा राहिला तर पुढच्या शुक्रवारीही कासव थिएटरवर असेल.'

कासव या चित्रपटात इरावती हर्षे, आलोक राजवाडे, डाॅ. मोहन आगाशे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. 

 

 

Web Title: kaasav marathi movie esakal news