कबीर बेदींनी सनी लियोनीकडं मागितला फोन नंबर, पुढं झालं असं!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

डब्बू रतनानी कॅलेंडर २०२० च्या लॉंच निमीत्त ठेवलेल्या पार्टीच्या वेळी बरेच बॉलिवूड सेलिब्रेटी गोळा झाले होते. याच कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांनी सनी लिओनीची भेट घेतली.

मुंबई : बॉलिवूड मध्ये अत्यंत कमी काळामध्ये नाव मिळवलेल्या सनी लियोनीला सगळेच ओळखतात, तीच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे ती सोशल मिडीयावरती कायम चर्चेत असते. बॉलीवूडमधील प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याच्या कॅलेंडर-2020 च्या लॉंच पार्टीमध्ये घडलेल्या एका प्रकारची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण, आणखी एका कारणानं सनी चर्चेत आलीय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं नेमकं?
डब्बू रतनानी कॅलेंडर २०२० च्या लॉंच निमीत्त ठेवलेल्या पार्टीच्या वेळी बरेच बॉलिवूड सेलिब्रेटी गोळा झाले होते. याच कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांनी सनी लिओनीची भेट घेतली. विशेष म्हणजे कबीर बेदी यांनी सनीकडे तिचा फोन नंबर मागितल्याची माहिती आहे. कबीर बेदींचा हा खोडसाळ पणा सनीने चांगलाच ओळखला आणि बेदींना नंबर दिला, पण कोणाचा? सनी त्यांना नंबर द्यायला नकारही देऊ शकत नव्हती. त्यामुळं तिनं नवरा डेनिअल वेबर याचा नंबर देऊन स्वतःची सुटका करून घेतली. कबीर बेदी आणि सनीच्या या नंबर एक्श्चेंजचा किस्सा, सध्या इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत आलाय.

टॉपलेस फोटो शूट 
डब्बू रतनानीनं नुकतच 2020चं कॅलेंडर प्रसिद्ध केलंय. त्यात सनी लियोनीने टॉपलेस फोटो शूट केलंय. केवळ सनीच नव्हे तर, कियारा अडवानी आणि भूमी पेडणेकर यांनीही सनी प्रमाणचं टॉपलेस फोटो शूट केलंय. त्यामुळं सनी आणि कियारा, भूमीच्या टॉपलेस फोटोंची सध्या चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या हे फोटो खूप शेअर होत आहेत. दरम्यान, कबीर बेदी हे त्यांच्या तिसऱ्या लग्नामुळं चर्चेत आले आहेत. 2016मध्ये त्यांनी तिसरा विवाह केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kabir bedi asks sunny leone for cell no she gives husbands number