
Kacha Badamच्या भुवनचं नवं गाणं व्हायरल| Viral Video
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'कच्चा बादाम' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. ते प्रचंड व्हायरल (Viral Video) झालं. शेंगदाणे विक्रेता भुवन बादायकर (Bhuban Badyakar) या गाण्यानंतर रातोरात लोकप्रिय झाला. कच्चा बादाम गाण्यावर देश-विदेशातील लोकांनी ठेका धरला. त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले. आता पुन्हा भुवनने गायलेलं नवं गाणं सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. हे गाणंही लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
हेही वाचा: भारताने गौरवले टांझानियाच्या किली पॉलला!
कच्चा बादाम गाण्यानंतर भुवनचे सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत चाहते झाले. मध्यंतरीच्या काळात त्याच्याविषयी अनेक बातम्या येत राहिल्या. पण नवे गाणे आले नव्हते. तरीही कच्चा बादाम ची क्रेझ मात्र कायम होती. आता भुवनने गायलेले गाणेही बंगालीतही आहे. हे गाणे किती लोकप्रिय होईल ते येत्या काळात कळेलच.
हेही वाचा: 22022022- आजची तारीख पाहिलीत का? किती वर्षांनी आलाय योग!
Web Title: Kacha Badam Viral Video Bhuban Badyakar New Song Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..