Kajal Aggarwal Viral Video : सेल्फीच्या निमित्तानं जवळ आला अन्... अभिनेत्री काजोलसोबत चाहत्याचं बेशिस्त वर्तन!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol Agrawal Viral Video) ही आता त्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
Kajal Aggrawal News
Kajal Aggrawal News esakal
Updated on

Kajol Agrawal viral video : बॉलीवूड सेलिब्रेटींसोबत फोटो काढण्याची चाहत्यांना भारी हौस असते. त्यात जर आपला आवडता कलाकार एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चाहत्याला भेटला तर त्यांच्या उत्साहाला उधाण येते. मात्र या उत्साहात अनेक चाहते नको ती चूक करुन जातात त्यामुळे सेलिब्रेटींनाही राग अनावर होतो. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा दिसून आला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्री काजोल अग्रवालचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये चाहत्यानं तिच्याशी बेशिस्त वर्तन केल्याचे दिसते. यामुळे काजोलनं देखील तीव्र शब्दांत तिची नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कित्येक सेलिब्रेटींसोबत चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे बेशिस्त वर्तन करत त्यांचा राग ओढावून घेतला होता. प्रसिद्ध अभिनेता अली फझलच्या बाबतही असाच प्रसंग घडला होता.

काजोल ही नेहमी प्रमाणे तिचे काही प्रमोशन सोहळे आणि कार्यक्रमांमध्ये बिझी असल्याचे दिसते. मात्र यावेळी अशाच एका सोहळ्यामध्ये तिला वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे तिनं नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांचा अतिउत्साहीपणा हा त्याच्या अंगलट आल्याचे त्या व्हिडिओमधून दिसून आले आहे. फोटोच्या निमित्तानं त्यानं अभिनेत्रीला हात लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे अभिनेत्रीही नाराज झाली.

काजोल ही हैद्राबादमध्ये एका सोहळ्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला अपमानाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचवेळी एका चाहत्याला तिच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. काजोलनं त्याला परवानगी दिली. मात्र त्याचा गैरफायदा चाहत्यानं घेतल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसते. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्यावर अनेकांनी संबंधित चाहत्याला फटकारले आहे. इंडिया डॉट कॉमनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Kajal Aggrawal News
Laapataa Ladies Marathi Review: पत्नी हरवल्याचे दुःख आणि मग... विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा लापता लेडीज

विद्या बालनच्या बाबतही घडला होता असाच प्रकार...

यापूर्वी देखील अनेक सेलिब्रेटींना वेगवेगळ्या प्रकारे चाहत्यांच्या बेशिस्तपणाचा सामना करावा लागला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन जेव्हा गझल सम्राट पंकज उधास यांच्या अंत्यविधीसाठी गेली होती तेव्हा चाहत्यांनी तिच्याकडे सेल्फीची मागणी केली होती. चाहत्यांचा हा वेडेपणा पाहून तिला प्रचंड संताप आला होता. तिनं लोकांना कोणत्या प्रसंगी कसे वागावे हेही कळत नाही का, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com