काजोल-राणीचा वाद मिटला? दूर्गापूजेत एकत्र

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यानेही या दोघींमधील वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. पण काही केल्या हे वाद मिटले नाहीत. पण आता दूर्गापूजेत या दोघींना एकत्र बघितल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

मुंबई : काजोल व राणी मुखर्जी बहिणी असल्यातरी त्यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. पण हा वाद विसरून राणी आणि काजोल एकत्र आल्या व त्यांनी दूर्गापूजा साजरी केली. काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या कुटूंबाचे व मित्रमंडळींचे फोटो शेअर केले आहेत. यात बहिण तनिषा, आई तनुजा, राणी मुखर्जी असे सर्वजण दिसत आहेत. 

काही वर्षांपूर्वी अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार' व आदित्य चोप्राचा 'जब तक है जान' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करण्यात आला. यावरून बरेच वादही झाले. हा विषय न्यायालयापर्यंत गेला. या वादानंतर काजोल-राणी या बहिणींनी एकमेकींशी बोलणं सोडून दिलं. त्यानंतर आता नवरात्रीत दूर्गापूजेत त्या एकत्र दिसत आहेत. यावरून असं कळतंय की या दोघींमधले वाद मिटलेले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wishing every one a very happy ashtami..... Jai Mata Di.

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यानेही या दोघींमधील वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. पण काही केल्या हे वाद मिटले नाहीत. पण आता दूर्गापूजेत या दोघींना एकत्र बघितल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kajol and Rani Mukhrjee together in durgapuja