दुर्गापूजेत काजोलच्या मुलाचा आईकडे हट्ट; व्हिडीओ व्हायरल

अष्टमीच्या निमित्ताने दुर्गा पूजा करण्यासाठी मुखर्जी कुटुंबीय आले एकत्र
Kajol with her son Yug
Kajol with her son YugInstagram
Summary

अष्टमीच्या निमित्ताने दुर्गा पूजा करण्यासाठी मुखर्जी कुटुंबीय आले एकत्र

नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल Kajol अजूनही तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुखर्जी कुटुंबाने अष्टमीच्या निमित्ताने दुर्गा पूजेला हजेरी लावली होती. यावेळी काजोलची आई तनुजा आणि बहीण तनिषा मुखर्जीदेखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे यावेळी काजोलसोबत तिचा मुलगा युगसुद्धा दर्शनासाठी आला होता. संपूर्ण मुखर्जी कुटुंब पारंपारिक लूकमध्ये दिसले. काजोल आणि युगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो आईजवळ हट्ट करताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काजोल तिच्या मुलाला समजावताना आणि प्रेमाने त्याला जवळ घेताना पहायला मिळत आहे. काजोलचं मातृप्रेम या व्हिडीओत स्पष्टपणे झळकत आहे. यावेळी तनिषा मुखर्जीने कोरोनाकाळात दुर्गा उत्सव साजरा करण्याविषयी आणि त्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल तिचं मत व्यक्त केलं. मुखर्जी कुटुंबीय दरवर्षी दुर्गा उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि संपूर्ण कुटुंबासह उत्तर मुंबई दुर्गा पूजा समितीच्या तर्फे या उत्सवाचा आनंद घेतात. काजोल गेली अनेक वर्षे दुर्गा पूजेच्या उत्सवात सक्रियपणे सहभागी होते. अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अयान मुखर्जी यांच्यासोबतही काजोल दुर्गापूजेत सहभागी झाल्याचे फोटो पाहायला मिळतात. गेल्या वर्षी कोविड संकटामुळे त्यांना दुर्गा पुजेचा हा उत्सव रद्द करावा लागला होता.

Kajol with her son Yug
Aryan Khan Drug Case: 'स्टारकिड्स देश सोडण्याच्या तयारीत'

याआधी अभिनेत्री मौनी रॉयदेखील पारंपारिक बंगाली लूकमध्ये माँ दुर्गाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती, तर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता गोवारीकर देखील पूजेत सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com